Devendra Fadnavis : ‘गोदावरी’च्या नूतनीकरणासाठी २०० कोटीचा निधी द्या; मंत्री विखेंची फडणवीसांकडे मागणी

Devendra Fadnavis : 'गोदावरी'च्या नूतनीकरणासाठी २०० कोटीचा निधी द्या; मंत्री विखेंची फडणवीसांकडे मागणी

0
Devendra Fadnavis : 'गोदावरी'च्या नूतनीकरणासाठी २०० कोटीचा निधी द्या; मंत्री विखेंची फडणवीसांकडे मागणी
Devendra Fadnavis : 'गोदावरी'च्या नूतनीकरणासाठी २०० कोटीचा निधी द्या; मंत्री विखेंची फडणवीसांकडे मागणी

Devendra Fadnavis : नगर : गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्या, अशी मागणी उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली आहे. याबाबत लवकरच निर्णय करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

अवश्य वाचा : पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

दुरूस्ती होत नसल्याने आवर्तन पोहचण्यास उशीर

ब्रिटिश कालवे म्हणून गोदावरी कालव्याची ओळख वर्षांनुवर्ष जुन्या झालेल्या या कालव्यांना एकदाच नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानंतरही दुर्लक्षित झालेल्या गोदावरी कालव्यांची दुरूस्ती होत नसल्याने गोदावरी धरण समूहातून सोडण्यात येणारे आवर्तन लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पोहचण्यास मोठा कालावधी लागतो. यावरून पाण्याचे संघर्षही निर्माण शेतकऱ्यांचा संपूर्ण रोष विभागावर आणि सरकारवर येतो. ही वास्तविकता मंत्री विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

नक्की वाचा : राज ठाकरेंवर टीका केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरींची गाडी

उपमुख्यमंत्र्यांची निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही (Devendra Fadnavis)

कालव्याच्या दुरूस्तीकरिता निधी उपलब्ध झाल्यास कालव्याची काम वेगाने पूर्ण होतील. पाण्याच्या आवर्तनातील सर्व अडथळे दूर झाल्यास शेवटच्या गावापर्यंत पाणी विनाविलंब पोहण्यास मोठी मदत होईल, याकडे उपमुख्यमंत्र्याचे लक्ष वेधण्यात आले. गोदावरी कालव्यांचे क्षेत्र खूप मोठे आहे. नाशिक, नगर जिल्ह्यातील तालुक्याची सिंचन व्यवस्था या कालव्यांवर अवलंबून आहे. त्यामुळेच कालव्याची झालेली जीर्ण अवस्था आणि कालव्यामध्ये असलेले अडथळे तातडीने काढून टाकणे गरजेचे आहे. यासाठीच निधी उपलब्ध करून द्यावा, या मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. उपमुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली असल्याचे महसूलमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here