Devendra Fadnavis : कोणत्याच पक्षात आम्हाला हरवण्याची ताकद नाही : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : कोणत्याच पक्षात आम्हाला हरवण्याची ताकद नाही : देवेंद्र फडणवीस

0
Devendra Fadnavis : कोणत्याच पक्षात आम्हाला हरवण्याची ताकद नाही : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : नगर : हरियाणातील निवडणुकीचा निकाल (Haryana Election Results) हाती आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, “लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी म्हणालो होतो की आम्ही विरोधी पक्षाकडून हरलो नाही. लोकसभेत भाजपाच्या (BJP) काही जागा या अपप्रचारामुळे कमी झाल्या. आम्हाला हरवण्याची ताकद कुठल्याच विरोधी पक्षात नव्हती. आम्हाला अपप्रचार या चौथ्या पक्षानं हरवलं.

नक्की वाचा: दिराने केली दोन भावजयींची कोयत्याने हत्या

फडणवीस पुढे बोलताना ते म्हणाले की

हरियाणात जे घडलं, तेच महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबर महिन्यात पाहायला मिळणार आहे. आम्हाला गेल्या निवडणुकीत हरियाणामध्ये भाजपाला ४० जागा मिळाल्या. लोकसभेत १० पैकी ५ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपाला थेट ५० जागा मिळत आहेत. ६० वर्षांनंतर पहिल्यांदाच एका पक्षाने सलग तिसऱ्यांदा हरियाणाची सत्ता काबीज केली आहे.

अवश्य वाचा: राहुरीत तनपुरे व कर्डिले यांच्यातच लढतीची शक्यता

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले

नुकतेच जाहीर झालेल्या जम्मू-काश्मीर व हरियाणा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. यानंतर होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठीचे वातावरण आता तापू लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी त्यांच्या पक्षाचे पहिले उमेदवार जाहीर देखील केले आहेत. या पार्श्वभूमीवर आता लवकरच निवडणुकांची घोषणा होणार असून दुसरीकडे आघाड्यांचं जागावाटपही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis : कोणत्याच पक्षात आम्हाला हरवण्याची ताकद नाही : देवेंद्र फडणवीस

पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक (Devendra Fadnavis)

राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर पहिली सलामी हरियाणाने दिली आहे. यानंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे. हा विजय भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा विजय आहे. कारण जे लोक म्हणत होते की रक्ताचे पाट वाहतील त्यांनी येऊन बघावं की आम्ही काश्मीरमध्ये निवडणूक घेऊन दाखवली. मी केवळ हरियणाचं बोलणार नाही तर जम्मू काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला? मी म्हटलं कुठला पक्ष जिंकला हे महत्त्वाचं नाही तिथे भारत आणि लोकशाही जिंकली आहे. कुठलीही भीती किंवा तत्सम वातावरण कुठेही नव्हतं. लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या निवडणुका आपण घेऊन दाखवल्या. आंतराराष्ट्रीय जगतात पाकिस्तान जे सांगत होता की सेनेच्या माध्यमातून कब्जा केला आहे. त्या पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक आपण घेऊन दाखवली. जगाने मान्य केलं की ३७० कलम हटवणं योग्य होतं. जम्मू काश्मीर भारताचं अविभाज्य अंग आहे. असं देवेंद्र फडणवीस आहे. जम्मू काश्मीरमध्ये सरकार कुणाचं बनणार हे महत्त्वाचं नाही. असंही फडणवीस म्हणाले.