Devendra Fadnavis : गडचिरोलीत माओवाद्यांची (Maoist) नाळ तुटली आहे. आता बोटावर मोजण्याइतके लोक जंगलात आहेत. त्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी बंदूक टाकून आता मुख्य धारेत यायला हवं. त्यात त्याचं भलं आहे,असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माओवाद्यांना केलं आहे. ते गडचिरोली (Gadchiroli) येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’च्या विविध प्रकल्पांचे उदघाटन व पायाभरणी कार्यक्रमात बोलत होते.
नक्की वाचा : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा ‘रमी’ खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल;प्रकरण नेमकं काय ?
‘गडचिरोली जिल्हा आम्ही माओवाद मुक्त करणार’ (Devendra Fadnavis)
ते पुढे म्हणाले की, माओवाद मुक्त गडचिरोली जिल्हा आम्ही करणार आहे. जंगलातील बंदुकीचा माओवाद संपतोय, मात्र एका नव्या माओवादापासून संरक्षित राहायला पाहिजे. एकीकडे आपण गडचिरोलीचे भूमिपूजन केले तर दुसरीकडे आदिवासींच्या जमीन लुटल्या जात आहेत, अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. याची चौकशी केल्यावर दोन जण कोलकता येथे होते, त्यातलं महाराष्ट्रातील कोणी नव्हते. त्यामुळे अशा लोकांपासून आपल्याला सावध राहिले पाहजे,असंही फडणवीस म्हणालेत.
‘गडचिरोलीत येत्या २ वर्षात २ कोटी वृक्ष लावणार’ (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, गडचिरोलीतील जल-जमीन-जंगलचा विनाश होऊ देणार नाही. कुठलेही प्रदूषण होऊ नये, महाराष्ट्रातील पहिल्या स्लरी पाईपलाईनचे उदघाटन केले आहे. ग्रीन ट्रान्सपोर्टेशन आहे, ट्रक इलेक्ट्रिक आहेत. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील ग्रीन जिल्हा आहे. आपल्याला या जिल्ह्याचे जंगल वाढवले पाहिजे म्हणून येत्या २ वर्षात २ कोटी वृक्ष लावणार आणि ४० लाख वृक्ष लागवडीची आज सुरवात करतोय, अशी माहिती हि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.