Devendra Fadnavis:लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? – देवेंद्र फडणवीस 

0
Devendra Fadnavis:लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? - देवेंद्र फडणवीस 
Devendra Fadnavis:लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? - देवेंद्र फडणवीस 

नगर : लाल संविधान (Red Constitution) किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहात ?असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना केला आहे. राहुल गांधी हे आज (ता.६) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यापूर्वी आज देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रा संविधान बचाव मुद्द्यावरून त्यांच्यावर तोफ डागली आहे. ते कोल्हापूर मध्ये बोलत होते.

नक्की वाचा : आमदार जगताप यांच्यामुळे नगरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना : घुले

लाल संविधान कशासाठी ? (Devendra Fadnavis)

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भारत जोडा असा समूह करण्यात आला आहे. ज्यामध्ये अनेक संघटना सामील झाल्यात. ज्या संघटना अतिशय डाव्या विचाराच्या आहेत.त्यांची ध्येयधोरणे पाहता ती अराजकता पसरवणारी यंत्रणा आहे. ते पुढे म्हणाले की,राहुल गांधी एक पुस्तक दाखवतात.संविधानाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, मग लाल संविधान कशासाठी ? लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहेत? भारत जोडोच्या माध्यमातून अराजकता पसरवली जात असल्याचं आरोप त्यांनी केला.

अवश्य वाचा : शहराच्या विकास कामांमुळेच नागरिकांकडून जल्लोषात स्वागत : आमदार संग्राम जगताप

राहुल गांधींच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचे काम (Devendra Fadnavis)


फडणवीस यांनी सांगितले की,भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता परवणाऱ्या लोकांना एकत्र करून समाजात विद्वेष निर्माण करण्याचं काम होत आहे. अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की, लोकांची मन प्रदूषित करायची.त्यांच्यामध्ये अराजकता पसरवायची, जेणेकरून देशातील संस्था, सिस्टीम याच्यावरचा त्यांचा विश्वास उडेल. देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल, हेच अराजकता पसरवण्याचे काम राहुल गांधींच्या माध्यमातून होत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here