नगर : मला आता मुख्यमंत्रीपदाची (Maharashtra CM) लालसा उरलेली नाही, मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्यामध्ये मी काम करेन. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी ठामपणे उभा राहीन, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
नक्की वाचा : शरद पवारांनी केलेल्या नक्कलेवर अजित पवारांची प्रतिक्रिया
‘महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला’ (Devendra Fadnvis)
देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हणाले की,मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो.आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला आहे. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही,असं सांगितले आहे. यावेळी तुम्हाला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसण्यात रस आहे का, या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले. राजकारणात अशा चर्चा होत असतात, त्याची उत्तर द्यायची नसतात, असे फडणवीसांनी म्हटले. आर्थिक क्षेत्रात काम करणे ही माझी आवड होती. वकिली करणे हे माझे स्वप्न होते, पण ते स्वप्न भंगले. त्यामुळे मी गेल्या २५ वर्षांपासून विधानसभेत जनतेची वकिली करत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अवश्य वाचा : राज्यभरात थंडीची चाहूल,हवामान विभागाचा अंदाज
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही सडकून टीका केली. भाजप हा महायुतीमधील शक्तिशाली पक्ष असल्याने मविआचे नेते भाजपवर जास्त हल्ले करत आहेत. मविआच्या थिंक टँकने तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक हल्ला करा, त्यांची इमेज डाऊन करा, जेणेकरुन भाजप आणि महायुतीची ताकद कमी होईल, असा सल्ला दिल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
२३ तारखेची वाट बघा – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis)
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जागा कमी पडल्या तर उद्धव ठाकरे की शरद पवार, कोणासाठी दरवाजे उघडणार?, असा प्रश्न या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर फडणवीसांनी क्षणाचाही विलंब न लावता म्हटले की, आम्हाला कोणाचीही गरज लागणार नाही. तशी परिस्थितीची येणारच नाही. २३ तारखेची वाट बघा, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.