Devendra Fadnavis:देवेंद्र फडणवीसांचा संतोष देशमुखांच्या लेकीला फोन;बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल केलं अभिनंदन

0
Devendra Fadnavis:देवेंद्र फडणवीसांचा संतोष देशमुखांच्या लेकीला फोन;बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल केलं अभिनंदन
Devendra Fadnavis:देवेंद्र फडणवीसांचा संतोष देशमुखांच्या लेकीला फोन;बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल केलं अभिनंदन

नगर : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Satosh Deshmukh Murder) यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती.त्यामुळे देशमुख कुटुंबियांना मोठ्या कठीण प्रसंगाला समोर जावं लागलं. अशातच संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखचे (Vaibhavi Deshmukh) हे बारावीचे वर्ष होतं.आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैभवीनं या कठीण प्रसंगीही चांगला अभ्यास करत बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

काल (ता.५) बारावीचा निकाल लागला. ज्यात वैभवीने ८५.३३% टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनीही संतोष देशमुखांच्या लेकीला फोन करत बारावीत चांगले गुण मिळवल्याबद्दल तिचे अभिनंदन केलं आहे.

नक्की वाचा : देशातल्या कोणत्या जिल्ह्यात होणार मॉकड्रील,त्यात महाराष्ट्र आहे का ?  

पुढं जे शिक्षण घ्यायचं ते घे,आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)

कठीण परिस्थितीत वैभवीने चांगले गुण मिळवत परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवीला पुढं जे शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण घे,आम्ही तुझ्या पाठीशी कायम आहोत,असे आश्वासन दिले. तसेच दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देखील मिळेल,असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुखला पत्र सुद्धा लिहिले आहे. त्यात बारावीच्या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे.अंबेजोगाईची SDO दीपक वाजळे यांनी प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्र्यांचे हे पत्र वैभवी देशमुखला दिलं आहे.

अवश्य वाचा : बारावीचा निकाल जाहीर;यंदाही मुलींनीच मारली बाजी,राज्याचा निकाल ९१.८८ टक्के  

‘कौतुकाची थाप टाकण्यासाठी माझे वडील नाहीत’ (Devendra Fadnavis)

वैभवीने निकालाच्या सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेत त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. यावेळी आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत,याचं मला दुःख आहे, अशी खंत तिने व्यक्त केली होती. माझ्या वडिलांचा अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आला होता, त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच एक आरोपी अद्यापही फरार आहे, त्याला देखील अटक केली जावे,अशी मागणी वैभवी देशमुख हिने यावेळी केली आहे.