Devendra Fadnavis:’स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर बोलणारे लोक मूर्ख’- देवेंद्र फडणवीस

0
Devendra Fadnavis :'स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर बोलणारे लोक मूर्ख'- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis :'स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर बोलणारे लोक मूर्ख'- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrayveer Savarkar) हे अंदमानात शिक्षा भोगत होते, तेव्हा जेलची परिस्थिती अतिश्य वाईट होती. अंदमानात अनेकांवर परिणाम झाला, मात्र सावकरांमध्ये कुठलीही निराशा दिसली नाही. इतरांना पिटीशन करण्यात किंवा लवकर सुट्टी मिळावी, यासाठी ते मदत करायचे. पण काही मूर्ख लोक त्यांना माफीवीर म्हणतात. न्यायालयाने अशा लोकांना फटकारले हे बरे झाले,असे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

नक्की वाचा : संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचे गंभीर आरोप  

‘पुन्हा असे बोलाल तर शिक्षा देऊ’ (Devendra Fadnavis)

सर्वोच्च न्यायालयाने सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांना दम दिला आणि ‘पुन्हा असे बोलाल तर शिक्षा देऊ’,अशी ताकीद दिली. त्यासाठी मला सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानायचे आहेत. काही गोष्टी चुकीच्या पद्धतीनं घेतल्या जात असतील तर ते चुकीचं आहे. आता त्यांना अक्कल येईल असं वाटतं. मात्र, माझं हे बोलणं बाळबोध आहे हे पण मला माहिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती आणि हिंदुत्व प्रज्वलित झालं तर आपलं काही खरं नाही हे यांना माहिती आहे,असे फडणवीस यांनी म्हटले. ते मंगळवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

अवश्य वाचा : वैष्णवी हगवणेच्या लग्नात पाण्यासारखा खर्च;पहा नेमका खर्च किती?

फडणवीस पुढे म्हणाले की, तेव्हाचे अंदमान जेल अतिशय वाईट होते. अंदमानातील व्यक्ती परत येऊ नये, अशी व्यवस्था केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना एकांतवासाची शिक्षा त्यांना दिली गेली. काय अवस्था त्यावेळी माणसाची होत असेल. ते जेलमध्ये कोळशाचा वापर करुन कविता लिहायचे आणि पाठ करायचे. जनरल बारी सारखा जेलर कैद्यांना वाईट वागवायचा. तेव्हा सावरकरांनी बारीसोबत संघर्ष केला आणि कैद्यांना मौलिक अधिकार मिळवून दिले,असं त्यांनी स्पष्ट केले.

सावरकरांनी आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार घेतला – फडणवीस (Devendra Fadnavis)

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आंतरजातीय विवाह संदर्भात देखील पुढाकार घेतला होता. मराठी भाषेत प्रमाण भाषा तयार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. ‘विधिमंडळ’, ‘चित्रपट’ असे शब्द त्यांनी दिले आहेत. ‘निवृत्ती वेतन’ हा शब्द देखील त्यांनी दिला आहे. सावरकरांनी मराठी भाषेला समृद्ध करण्याचे काम केले. सावरकर यांचे हिंदुत्व देखील विज्ञाननिष्ठ होते. ते व्यक्ती नव्हे, ते एक संस्था होते. त्यांच्या नावाने संशोधन केंद्र सुरु होत आहे.