Devendra Fadnavis:’विरोधकांना मी पुन्हा माफ केले हाच माझा बदला’- देवेंद्र फडणवीस 

0
Devendra Fadnavis:'विरोधकांना मी पुन्हा माफ केले हाच माझा बदला'- देवेंद्र फडणवीस 
Devendra Fadnavis:'विरोधकांना मी पुन्हा माफ केले हाच माझा बदला'- देवेंद्र फडणवीस 

नगर : विरोधकांनी आपल्यावर टोकाची टीका केली, बदनामी करणाऱ्यांचा आपण बदला घेणार आहे.त्यांना माफ केले हाच आपला बदला असल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रि‍पदासाठी (CM) पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan)पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रि‍पदी विराजमान होणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तर एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा : “शिंदेंचं माहित नाही, मी तर उद्या शपथ घेणार”,अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य

‘बदनामी करणाऱ्यांचा आपण बदला घेणार’ (Devendra Fadnavis)

२०२२ साली महाराष्ट्रात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांनी बंड करून त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. परिणामी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले होते की, आपल्यावर टोकाची टीका केली, बदनामी करणाऱ्यांचा आपण बदला घेणार आहे. त्यांना माफ केले हाच आपला बदला असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आता देखील त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

अवश्य वाचा :  ठरलं तर मग!देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री  
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मी स्वल्प काय, अन् दीर्घ काय मी कोणताही द्वेषी कधीही नव्हतो. आपल्या राजकारणाच्या सोईसाठी काही नेत्यांनी माझी खलनायकी प्रतिमा तयार करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. महायुतीवर,भाजपवर आणि माझ्यावर जनतेने मोठा विश्वास विधानसभा निवडणुकीत टाकला आणि परस्पर सडेतोड उत्तर दिल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

‘महाविकास आघाडीने अनेकदा विरोधकांचा आवाज दाबला’ (Devendra Fadnavis)

विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या यंदा विधानसभेत फारच कमी असून बहुमतातील सरकार विरोधकांचा आवाज दाबेल, असा आरोप सातत्याने होत आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी म्हटलंय की, आम्ही कोणाचाही आवाज दाबणार नाही. विरोधकांची संख्या कमी आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. त्यांचे प्रश्न मांडण्याची पुरेपूर संधी त्यांना दिली जाईल. महाविकास आघाडीने अनेकदा विरोधकांचा आवाज दाबला, आम्ही त्याविरोधात संघर्ष केला होता, आता आम्ही सत्तेत आल्यानंतर त्याचा आवाज दाबायचा हे मला मान्य नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here