Devendra Fadnavis:’देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही तर लढणारा व्यक्ती’-देवेंद्र फडणवीस 

माझ्या डोक्यात स्ट्रॅटेजी (Strategy) होती. मी अमित शाह (Amit Shah) यांना भेटून आलो. त्यांनी मला सांगितलं आपण महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करु. मी एक मिनीट देखील शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईत भाजपची बैठक (BJP Meeting) पार पडली. यावेळी ते बोलत होते.

0
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. लढणारा व्यक्ती आहे. चारी बाजूंनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने सर्व किल्ले जिंकणारे शिवराय आमची प्रेरणा आहेत. कोणाला वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही. माझ्या डोक्यात स्ट्रॅटेजी (Strategy) होती. मी अमित शाह (Amit Shah) यांना भेटून आलो. त्यांनी मला सांगितलं आपण महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करु. मी एक मिनीट देखील शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये”,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईत भाजपची बैठक (BJP Meeting) पार पडली. यावेळी ते बोलत होते.

नक्की वाचा : रामोजी फिल्म सिटी वसवणारे रामोजी राव  काळाच्या पडद्याआड 

नरेंद्र मोदींनी केली नेहरूंची बरोबरी (Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस म्हणाले,कालच देशाच्या इतिहासामध्ये सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणण्याचे रेकॉर्ड यापूर्वी केवळ नेहरुंच्या नावावर आहे. त्यांची बरोबरी आता नरेंद्र मोदी यांनी केली आहे. लोकांनी मोदीजी आणि एनडीएवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. आपल्याला रणनिती ठरवण्यासाठी आजची बैठक महत्वाची आहे. महायुतीचे सरकार पुन्हा कसं आणता येईल. यासाठी प्रयत्न करुयात, असं आवाहन फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले.

अवश्य वाचा : मनोज जरांगेंचा संघर्ष रुपेरी पडद्यावर;’आम्ही जरांगे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

आपण नव्याने पेरण्याची वेळ आली आहे(Devendra Fadnavis)

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जसा आनंद आहे, तशीच मनात सल आहे. २०१४ आणि २०१९ ला आपण जो सिंहाचा वाटा उचलला होता तो आता आपण उचलला नाही. आता आपल्याला पुन्हा एकदा रणनीती ठरवता यावी यासाठी आजची बैठक आहे. पराभवाची कारणे शोधून ती कशी दूर करता येईल यासाठी आज निर्धार केला. उन्हाळा संपत आहे काहीली पण संपत आहे. पावसाळा जवळ आलाय. पाऊस पडताना जे पेरलं जातं ते उगवत. आपण नव्याने पेरण्याची वेळ आलेली आहे.

भाजपचे नेतृत्व मी करत असल्याने मी सांगितले या अपयशाची जबाबदारी माझी आहे. मी दोन्ही अध्यक्ष यांचे आभार मानतो. अर्थ मॅटिक मध्ये आपण कमी पडलो. मी म्हणालो की मला काम करण्याची संधी द्या. राजकीय गणितात आम्ही कमी पडलो. मी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करेन. सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं. मला मोकळं करुन काम करायची संधी द्या, असंही देवेंद्र फडणीस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here