Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Office) यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड (Sabotage) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,संबंधित महिला पास न काढता मंत्रालयात (Mantralaya) शिरली होती. सचिवांसाठी असलेल्या गेटने महिलेने मंत्रालयात प्रवेश केला. त्यानंतर तिने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड केली व ही महिला इथून निघून गेली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या महिलेचा शोध सुरु केला आहे. पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.
नक्की वाचा : पीएम किसानचा १८ वा हफ्ता ‘या’दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात येणार
मंत्रालयात नेमकं काय घडलं ? (Devendra Fadnavis)
तोडफोडीच्या या घटनेमुळे मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. ही महिला गुरुवारी रात्री मंत्रालयात शिरली. त्यावेळी मंत्रालयाच्या परिसरात फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे ही महिला कोणाच्याही लक्षात न येता सचिवांच्या गेटने सहजपणे आत मध्ये गेली. यानंतर ही महिला फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर केली आणि त्याठिकाणी तिने तोडफोड केली. या महिलेने कार्यालयाबाहेर देवेंद्र फडणवीसांची नेमप्लेट काढून फेकली आणि यानंतर घोषणाबाजी केली. ही महिला कोण होती,नक्की काय म्हणत होती आणि ती विनापास आतमध्ये कशी शिरली, हे अजून समजू शकलेले नाही. मरिनड्राईव्ह पोलिसांनी सध्या या घटनेचा तपास सुरु केला आहे. त्यामुळे आता तपासातून काय निष्पन्न होणार, हे लवकरच समजणार आहे.
अवश्य वाचा : मोठी बातमी!पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द
तोडफोडीच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी राज्य सरकारला घेरले (Devendra Fadnavis)
मंत्रालयात झालेल्या तोडफोडीच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. मंत्रालयातील गृहमंत्र्याचेच कार्यालय सुरक्षित नाही, याबाबत टीका केली जात आहे. देवेंद्र फडणवीस हे स्वत:ला आधुनिक काळातील अभिमन्यू म्हणवून घेतात. पण त्यांना जवळच्याच लोकांपासून धोका आहे का, हे त्यांनी तपासून पाहावे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली. तर भाजप नेते प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त करत पोलीस तपासात सगळ्या गोष्टी समोर येतील,असे सांगितले आहे.