
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ला (Ladki Bahin Yojana) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) नाव द्या,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) यांनी केली आहे. अमोल मिटकरींच्या या मागणीनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
नक्की वाचा: निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या दिवशी परिधान केलेल्या साड्यांची एवढी चर्चा का?
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी प्रश्न विचारताच त्यांनी महत्वाची माहिती दिली. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक मागण्या आहेत. याबाबत आम्ही बसून निर्णय घेऊ,असं फडणवीस म्हणाले. लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे राज्यांची महसुली तूट वाढत आहे, महाराष्ट्र हे महसुली तुटीमध्ये गेलं असल्याचे निरीक्षण यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकार कशा पद्धतीने परिस्थिती हाताळणार, तसेच कोणता महत्वाचा निर्णय घेणार,याकडे सर्व लाडक्या बहीणींचं लक्ष लागलं आहे.
अवश्य वाचा: सौंदाळा ग्रामपंचायतचा ऐतिहासिक निर्णय;दररोज गावासाठी राष्ट्रगीत लागणार
लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक ताण (Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana)
जून २०२४ ला जेव्हा योजना सुरु झाली, तेव्हापासूनच ती वादात व राजकारणात अडकून आहे. कधी नावं कपात केल्यामुळे, कधी ई-केवायसीमुळे, तर कधी इतर विभागाचे निधी योजनेसाठी वळवल्यामुळे. कारणं काहीही असो, वाद कितीही असो. योजना बंद केली जाणार नाही,असं महायुती सरकारनं स्पष्ट केलंय. लाडक्या बहिणींना महिन्याने पैसे मिळत राहणार असं सत्तेत बसलेला प्रत्येक नेता आजही सांगतोय. खरंतर, लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक ताण वाढल्याचं अजित दादांच्या अर्थखात्यानं पत्रक काढून सांगितलं होतं.मात्र तरीही योजनेवर कोणतंही संकट येणार नाही, याची काळजी मात्र अजितदादांनी घेतली होती. अशातच आता या योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली आहे.


