Devendra Fadnvis:“मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार”;देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्याचे मोठे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

0
Devendra Fadnvis
Devendra Fadnvis

नगर : मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्याचे मोठे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत असताना, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत (Maratha Reservation) हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

नक्की वाचा : ‘लाडकी बहीण नाही,लाडकी सत्ता हवी’;बाळासाहेब थोरात यांची अजित पवारांवर टीका

‘मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळाले पाहिजे’ (Devendra Fadnvis)

देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळाले पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. आरक्षण आणि विकासाच्या सर्व प्रश्नांबाबत चर्चेतून मार्ग काढण्यात येत आहेत. काहीही झाले, तरी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणाऱ्या आरक्षणाबाबत निर्णय घेणार आहे. मराठा समाज शतकानुशतके समाजातील अठरापगड जाती-जमातींना सोबत घेऊन चाललेला आहे. या समाजाचे आर्थिक, सामाजिक उन्नतीचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिली.

अवश्य वाचा : मराठी सिनेसृष्टीवर शोककळा;ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन

‘मराठा समाजाच्या विकासासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील’ (Devendra Fadnvis)

मराठा समाजाच्या विकासासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. बँकांच्या माध्यमातून साडेआठ हजार कोटींचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. तब्बल ८२५ कोटी व्याज परतावा महामंडळाने दिला आहे. आता महामंडळाने आणखी पाच लाख उद्योजक बनवावेत आणि या उद्योजकांनी २५ लाख नोकऱ्या द्याव्यात,असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ‘सारथी’सारख्या संस्थांच्या निर्मितीने गरीब शेतकऱ्यांच्या, मराठा समाजातील सर्वसामान्यांच्या तरुणांना स्पर्धा परीक्षांचे दालन उपलब्ध करून दिले आहे. समाज, समाजातील तरुण यांच्या विकासासाठी कार्ययोजना करणे आवश्यक असते; ते ‘सारथी’ने करून दाखविले आहे,असं फडणवीस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here