Devendra Fadnavis:”शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष!मात्र”…;देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य 

0
Devendra Fadnavis:
Devendra Fadnavis:"शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष!मात्र"...;देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य 

Devendra Fadnavis : अंबादास दानवे हे मूळचे भाजपातले आहेत. काही कारणांमुळे पक्षाने त्यांना सोडलं. त्यानंतर मग अंबादास दानवे (Ambadas Danve) हे आमचा त्यावेळचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेत गेले. खरंतर शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष आहे, मात्र आता थोडे बदल झाले आहेत,असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच राहुल गांधी (Rahul Gandhi) हे जोपर्यंत युवा नेते आहेत तोपर्यंत तुम्ही आणि मी आपण दोघंही युवा नेते आहोत, असाही टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अंबादास दानवेंबाबत बोलताना शिवसेनेला लगावला.

नक्की वाचा :  आयुष्मान कार्ड योजनेचा कोणत्या रुग्णांना मिळणार फायदा ? जाणून घ्या सविस्तर…   

देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेला टोला (Devendra Fadnavis)

अंबादास दानवे यांचा विधान परिषदतेला कार्यकाळ संपतो आहे. त्यासाठी अजून ४४ दिवस बाकी आहेत.आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत अंबादास दानवेंबाबत गौरवोद्गार काढत आणि आपल्या खास शैलीत भाषण करत शिवसेनेला चिमटे काढलेत.

अवश्य वाचा : मोठी बातमी!आमदार,खासदारांसाठी म्हाडाचे घर अवघ्या साडेनऊ लाखात! 

‘अंबादास दानवे हे मूळ आमच्या भाजपचे आहेत’ (Devendra Fadnavis)


देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, अंबादास दानवे हे माझ्या पेक्षा लहान आहेत पण माझ्यापेक्षा मोठे कलाकार आहेत. जरी ते आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असले तरीही ते मूळ आमच्या भाजपाचे आहेत. अंबादास दानवे यांचं जीवन भाजपातच सुरु झालं. एक प्रभावी नेते म्हणून काम करत होते. काही वाद झाले आणि पक्षाने त्यांना सोडलं. मग तेव्हाचा आमचा मित्र पक्ष, म्हणजे आमचा मित्र आजही शिवसेना आहेच पण थोडे काही बदल झाले आहेत. त्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. पण त्यांचं राजकीय जीवन भाजपात घडलं. 

शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी विविध पदांवर काम केलं. जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्येत त्यांनी एम ए केलं. अपेक्षा होती की ते बातम्या संकलित करतील पण ते बातम्या पुरवणारे झाले. राजकीय क्षेत्रात पत्रकार आणि वकील सगळ्यात जास्त बघायला मिळतात. सभागृहाला एक चांगला नेता मिळाला. भाजपच्या मुशीत तयार झाल्याने त्यांच्यात चिकाटी, अभ्यासू वृत्ती पाहण्यास मिळते. इतर पक्षांमध्ये असं होत नाही असं नाही. पण १५ वर्षे ते भाजपात होते असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.