Devendra Fadanvis : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) जाहीर झाली आहे. आज निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘शंखनाद’ या एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
नक्की वाचा : भाजपकडून लाडकी बहीण योजनेची जोरदार जाहिरात,मात्र मुख्यमंत्री शब्द वगळला
शंखनाद! या एका शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केली आहे. या पोस्टसह देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे. जिस गतीसे है चला तू उस गती को पायेगा.. या गाण्यावरचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांचे आक्रमक अंदाज दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. ते अपयश धुवून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस तयार आहेत असंच ते या पोस्टमधून सांगत असल्याचे दिसत आहे.
अवश्य वाचा : जादूटोण्याच्या संशयातून महिलेचा खून; आरोपीला दौंड तालुक्यातून अटक
देवेंद्र फडणवीसांच्या दुसऱ्या पोस्टमध्ये काय?(Devendra Fadanvis)
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की,लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल! आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण २० नोव्हेंबरला एकत्र साजरे करू! भाजपाच्या नेतृत्वात आपण २०१४, २०१९ ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या आणि २३ नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या! या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय. अशी पोस्टही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महाराष्ट्रात निवडणूक कधी?(Devendra Fadanvis)
महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक होणार असून २० नोव्हेंबरला ही निवडणूक घेतली जाणार आहे. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. गॅझेट नोटिफिकेशनची तारीख २२ ऑक्टोबर असेल तर २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे.