
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना कर्ज देताना त्यांच्याकडे सिबिलची (CIBIL) मागणी करू नका, असं म्हणत मुख्यमंत्रांनी आयसीआयसीआय, एचडीएफसी, अॅक्सिस बँक यांना (Banks) चांगलंच सुनावले आहे. तसे आदेश रिझर्व्ह बँकेने सुद्धा दिले आहेत. उल्लंघन करणाऱ्या बँकांवर सरकारने गुन्हा दाखल केला आहे, असंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या सर्वसमावेशक विकासासाठी राज्य सरकार आणि बँकांनी एकत्रित काम केलं पाहिजे, असं ते म्हणालेत. मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी बँकांना काही सूचना केल्या.
नक्की वाचा : ‘कप बशी’ या चित्रपटात दिसणार पूजा सावंत व ऋषी मनोहरची जोडी
शेतकऱ्यांना सिबिल मागू नका… (Devendra Fadnavis)
शेतकऱ्यांना सिबिल मागू नका, हे बँकांना वारंवार सांगितले गेले आहे. तरीही त्यांच्याकडून सिबिल मागितले जाते.आम्ही अशा बँकावर एफआयआर पण केले.मात्र तुम्हालाच हे गांभीर्याने घ्यावे लागेल. त्यावर तोडगा काढा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी बँकांना केल्या. सिबिलसंदर्भात रिझर्व्ह बँकेने सुद्धा बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत. जर कोणती बँक शाखा सिबिल मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
अवश्य वाचा : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला दणका;इन्स्टाग्राम अकाउंट बंद
‘बँकांनी शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करावे’ (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यावेळी दुष्काळी परिस्थिती नाही. त्यामुळे पीक चांगले येणार असे संकेत आहेत. अशातच बँकांनी शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करायला हवे. FPO महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहेत. गुंतवणुकीचा मोठा ओघ राज्यात आहेत. दावोसमधून १६ लाख कोटींची गुंतवणूक येणार आहे. महाराष्ट्र आता स्टार्टअपची राजधानी आहे. त्यामुळे तेथेही लक्ष दिले तर रोजगार निर्मिती मोठ्या संख्येने होईल, असं त्यांनी स्पष्ट केले.