Devendra Fadnavis: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे २०२६ मध्ये अनावरण होईल – देवेंद्र फडणवीस 

0
Devendra Fadnavis:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे २०२६ मध्ये अनावरण होईल - देवेंद्र फडणवीस 
Devendra Fadnavis:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे २०२६ मध्ये अनावरण होईल - देवेंद्र फडणवीस 

Devendra Fadnavis : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Day) आज बाबासाहेबांना दादर येथील चैत्यभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी आदरांजली वाहिली. यादरम्यान बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)यांनी इंदू मिल (Hindu Mill Statue) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून २०२६ मध्ये याचं अनावरण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

नक्की वाचा: विराटकडे इतिहास घडवण्याची संधी;आज होणार का शतकांची हॅटट्रिक? 
६ डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काल (ता.५) मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शनिवारी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या वर्षभरात इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस असल्याचे सांगितले.

अवश्य वाचा: मराठी माणूस पंतप्रधान होण्याच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

२०२६ च्या महापरिनिर्वाण दिनी होणार पुतळ्याचे लोकार्पण  (Devendra Fadnavis)

पुतळा संघर्ष समितीच्या मागणीमुळे नव्या सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नव्याने समन्वय समिती स्थापन केली होती. येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचा ढाचा उभारण्याचे नियोजन आहे. यानंतर पुतळ्याच्या उभारणीत अडचणी न उद्भवल्यास पुढच्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण होऊ शकणार आहे, असे स्मारक समितीकडून सांगण्यात आले आहे.

स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण  (Devendra Fadnavis)

सध्या स्मारकाचे ५०% काम झाले असून पुतळ्याची उभारणी हे प्रकल्पातील आव्हान आहे. शंभर फुटाचा पायथा आणि ३५० फूट उंच पुतळा असे एकंदरीत भव्य स्मारक असणार आहे. या स्मारकातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाची शंभर टक्के स्ट्रक्चरल कामे झाली आहेत. सध्या अंतर्गत सजावटीची कामे सुरु असून, बाहेरील विकासाची कामेही सुरू आहेत. त्यामुळे वर्षभरात हे स्मारक खुले होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.