Devendra Fadnavis:“मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही”- देवेंद्र फडणवीस

0
Devendra Fadanvis:“मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही
Devendra Fadanvis:“मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही"- देवेंद्र फडणवीस

नगर : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस हे पुढचे मुख्यमंत्री (Chief Minister) असतील अशा चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

नक्की वाचा : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची मांदियाळी

‘मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही’ – फडणवीस (Devendra Fadnavis)

तुम्हाला वैयक्तिक पातळीवर मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता,’भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भावना असणं स्वाभाविकच आहे. मात्र वस्तुस्थिती पाहायची असते. आघाडी किंवा महायुतीचं राजकारण हे वास्तवावर आधारीत असतं. तिथे भावनेला प्राधान्य देता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची कुठलीही शर्यत नाही, मी अशा अशा कुठल्याही शर्यतीत सहभागी नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी राज्याचं नेतृत्व करत होतो. त्यात महाराष्ट्रात अपयश आलं. मात्र त्यानंतरही पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला. विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली. माझ्यासाठी ही बाब पुरेशी आहे. मुख्यमंत्री होणं ‘माझ्यासाठी गौण बाब आहे”,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

अवश्य वाचा : जनधन खाते सुरु ठेवण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य; केंद्रसरकारचा निर्णय

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? (Devendra Fadnavis)

२०१९ च्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं. त्यावेळी सगळी बोलणी शरद पवार यांच्याशी झाली होती. शरद पवारांच्या सांगण्यावरुनच राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच सगळं काही ठरलं होतं, मात्र शरद पवार यांनी अचानकपणे अंग काढून घेतलं. त्यावेळी अजित पवारांनी दिलेला शब्द पाळला आणि पुढाकार घेतला. मात्र आमचं ते सरकार चालू शकलं नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा का दिल्या यावरही उत्तर दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here