Devendra Fadnavis:संतोष देशमुखांचे ‘ते’ क्रूर फोटो कधी पाहिले ?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया 

0
Devendra Fadnavis:संतोष देशमुखांचे ‘ते’ क्रूर फोटो कधी पाहिले ?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया 
Devendra Fadnavis:संतोष देशमुखांचे ‘ते’ क्रूर फोटो कधी पाहिले ?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया 

नगर : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण (Santosh Deshmukh Murder Case) हत्या झाली होती. याप्रकरणी फेब्रुवारीच्या अखेर सीआयडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो (Viral murders photo) समोर आलेत. हे फोटो मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आधीच पाहिले असावेत,असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र आता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnvis) यांनी भाष्य केले आहे.

नक्की वाचा : धनंजय मुंडे यांना क्लीनचिट देणाऱ्या नामदेव शास्त्रींची भावना बदलली   

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ?(Devendra Fadnavis)

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरून विरोधकांनी दोषारोप केले. पण तपास नेमका कसा झाला? याबद्दल मुख्यमंत्री ददेवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलीय. ते म्हणाले, “संतोष देशमुख हत्या प्रकरण घडले, तेव्हाच याची सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल,त्या तपासात कुणाचाही हस्तक्षेप होणार नाही,असेही स्पष्ट निर्देश मी दिले होते. पूर्ण ताकदीनिशी तपास करा,असेही सीआयडीच्या पथकाला सांगितले होते.”

सीआयडीने चांगला तपास केला. आमच्या फॉरेन्सिक टीमने हरवलेले मोबाइल शोधून मोबाइलमधून डिलीट केलेली माहिती नव्या तंत्रज्ञानाने पुन्हा मिळवली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे जे फोटो समोर आले आहेत. ते पोलिसांनीच शोधले आहेत. या फोटोंना आरोपपत्रात समाविष्ट केले आहे,असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अवश्य वाचा :आदर्श शिंदे म्हणतोय ‘वढ पाचची’;आरडी चित्रपटातलं नवीन गाणं प्रदर्शित   

ते फोटो कधी पाहिले? (Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सीआयडीने जेव्हा आरोपपत्र दाखल केले, तेव्हाच मला तपासात काय आहे, ते कळले, तोपर्यंत मला याबद्दल माहीत नव्हते. मी गृहमंत्री असूनही मी सीआयडीच्या कामात हस्तक्षेप केला नाही. जर मीच निष्पक्ष तपास होण्यासाठी आग्रही असेल तर दुसऱ्या कुणाचीही तपासात आडकाठी आणण्याची हिंमतही नव्हती,असेही फडणवीस  यांनी सांगितले. तसेच तुम्ही संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो कधी बघितले? यावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच मी ते फोटो पाहिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here