CM Devendra Fadnavis:लाडकी बहीण योजनेचा हफ्ता अधिवेशन संपल्यानंतर मिळणार,मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द

0
CM Devendra Fadnavis:लाडकी बहीण योजनेचा हफ्ता अधिवेशन संपल्यानंतर मिळणार,मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द
CM Devendra Fadnavis:लाडकी बहीण योजनेचा हफ्ता अधिवेशन संपल्यानंतर मिळणार,मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द

नगर: जनतेला आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं. तसेच ज्या ज्या योजना आम्ही सुरु केल्या आहेत, त्यातील एकही योजना बंद होऊ देणार नसल्याचे आश्वासन देखील फडणवीसांनी दिले. ते विधानसभेत (Vidhansabha) बोलत होते. लाडक्या बहिणींनी महायुतीवर(Mahayuti) प्रेम दाखवलं आहे. लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या खात्यावर टाकणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

नक्की वाचा : ‘राम शिंदे ‘सर’असल्याने त्यांना क्लास चालवण्याची सवय’- देवेंद्र फडणवीस   

‘लाडक्या बहिण योजनेच्या बाबतीत नवीन निकष नाही’ (CM Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, लाडक्या बहिण योजनेच्या बाबतीत नवीन निकष काही नाहीत. योजना चुकीच्या पद्धतीने वापरत असेल तर ते तपासणं गरजेचं आहे. कारण हा जनतेचा पैसा आहे. समाजात चांगल्या प्रवृत्तीसारख्याच वाईट प्रवृत्ती देखील असतात. आम्ही शेतकरी असतील, युवा असतील, वंचितांच्या संदर्भातील योजना असतील, ज्येष्ठांच्या संदर्भातील सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अवश्य वाचा : मायरा वायकुळ चमकणार ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’चित्रपटात; चित्रपटाचे पोस्टर लॉन्च 

मारकडवाडीच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?(CM Devendra Fadnavis)

मारकडवाडीच्या मुद्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मला बाकीच्यांचे काहीही आश्चर्य वाटलं नाही, पण शरद पवारसाहेबांचं आश्चर्य वाटल्याचे फडणवीस म्हणाले. काँग्रेसने अनेकदा ईव्हीएमचा मुद्दा मांडला होता. पण शरद पवारसाहेबांनी यापूर्वी कधीही ईव्हीएमचा मुद्दा मांडला नाही. यावेळी मात्र, पवारसाहेब असं म्हणाले की, छोटी राज्य आम्ही जिंकतो आणि मोठी राज्य हे जिंकतात. कर्नाटक, पश्चिम बंगाल ही छोटी राज्ये आहे का ? असा सवाल फडणवीसांनी केला. मारकडवाडीत राम सातपुते यांनी जास्त मते मिळाल्यानंतर लोकांना धमकावण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. लोकांना धमकावलं होतं की, आपल्याला इथं बॅलेटवर मतदान घ्यायचं आहे, यामध्ये मतदान शरद पवार यांच्या पार्टीला मिळायला पाहिजे असं सांगितलं होतं. पण दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. जनतेनं आम्हाला दिलेलं बहुमत स्वीकारा. जनतेनं आम्हाला जो अधिकार दिला आहे. त्याचा अपमान करु नका, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here