Ram Shinde:’राम शिंदे ‘सर’असल्याने त्यांना क्लास चालवण्याची सवय’- देवेंद्र फडणवीस 

0
Ram Shinde:'राम शिंदे 'सर'असल्याने त्यांना क्लास चालवण्याची सवय'- देवेंद्र फडणवीस 
Ram Shinde:'राम शिंदे 'सर'असल्याने त्यांना क्लास चालवण्याची सवय'- देवेंद्र फडणवीस 

नगर : विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीतर्फे भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांची एकमताने निवड करण्यात आली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी सभागृहाचे तसेच विरोधकांचे आभार मानले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सर्व नेत्यांनी राम शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली.

नक्की वाचा : मंत्रिपद मिळावं ही कार्यकर्त्यांची भावना,मात्र मी देवाभाऊंसोबत -गोपीचंद पडळकर

‘राम शिंदे’ यांची एकमताने सभापतीपदी निवड (Ram Shinde)

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना सभापतीपद द्यावे,अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण भाजपने हे पद शिवसेनेला देण्यास नकार दिला होता. त्यानंतर भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी राम शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले. आज त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सभापती पदासाठी श्रीकांत भारतीय यांनी प्रस्ताव मांडला. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी सभापती म्हणून एकमताने राम शिंदे यांना निवडण्यात येत असल्याचे जाहीर केले.  

अवश्य वाचा : मोठी बातमी!रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राम शिंदे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे. मला विश्वास आहे की, आपण अतिशय शिस्तीने आणि संवेदनशीलतेने कार्यभार चालवाल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित त्यांच्या कुटुंबातील नवव्या पिढीतील व्यक्ती सभागृहात खुर्चीवर बसत आहे. एकप्रकारे त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली आहे. मुघलांनी ज्यावेळी हिंदू मंदिर संपवली होती. त्यावेळी मंदिर उभारणीचे काम अहिल्यादेवी होळकर यांनी केले होते. सरपंच पदापासून सुरू झालेला आपला प्रवास आता सभागृहाच्या सर्वोच्च पदापर्यंत आला आहे. चौंडी गावाचे सरपंच म्हणून आपण काम केले आहे. कधी कधी वाईटातून चांगलं होतं असतं. आपण थोड्या मतांनी विधानसभेला पडलात. परंतु, कदाचित नियतीच्या मनात तुम्हाला विधानपरिषद सभापती करायचं असेल त्यामुळे नियतीने हे केले असेल, असे त्यांनी यावेळी म्हटले.

 ‘रामभाऊ कुणावर अन्याय करणार नाहीत’ (Ram Shinde)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, आपण दोघे शिंदे आहोत, त्यामुळे काही अडचण नाही. रामभाऊ कुणावर अन्याय करणार नाहीत. सर्वांचे लाडके भाऊ ते आहेत. नावात राम आणि आडनावात शिंदे आहेत. त्यामुळे सर्वांच ऐकून घेतील. आणि काम पण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here