Devghar On Rent Movie: असंख्य गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील चिंचपोकळीच्या श्री चिंतामणीच्या (Shree Chintamani) दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ (Devghar On Rent Movie) या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित (Teaser Release) करण्यात आला आहे. शीर्षकामुळे मनात उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी होणाऱ्या ‘देवघर ऑन रेंट’ च्या टिमने चिंतामणीचे मनोभावे दर्शन घेतले आणि गणरायाच्या आशीर्वादाने चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या प्रसंगी चित्रपटातील कलावंत, निर्माते, दिग्दर्शक व तंत्रज्ञांची टीम उपस्थित होती.
नक्की वाचा : मराठा आरक्षणासाठीच्या नवीन जीआरनुसार कुणबी प्रमाणपत्र कुणाला मिळणार?
स्वरूप सावंत यांनी केले चित्रपटाचे दिग्दर्शन (Devghar On Rent Movie)
राधाकृष्ण प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. स्वरूप सावंत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कथालेखन स्वरूप सावंत, पूनम चौधरी पाटील, तर पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. अतिरिक्त पटकथा विशाल सुदाम जाधव यांनी लिहिली आहे. हा चित्रपट आध्यात्माची वर्तमानाशी सांगड घालणारा असल्याची जाणीव ‘देवघर ऑन रेंट’ या शीर्षकावरूनच होते. त्याला अनुसरूनच प्रदर्शित करण्यात आलेला टिझर चित्रपटाची तोंडओळख करून देणारा आहे. बेभानपणे जगताना आपल्या आतल्या आवाजाला आपण शरण गेलो तर आयुष्यातले सगळे मार्ग सोपे बनू शकतात. फक्त मार्ग निवडण्याची किंवा तो चुकलाच तर बदलण्याची आपली इच्छाशक्ती असली पाहिजे, हा अध्यात्माशी सांगड घालणारा विचार ‘देवघर ऑन रेंट’मध्ये अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. याची झलक टिझर पाहिल्यावर नक्कीच येते.
अवश्य वाचा : जीएसटीमध्ये लवकरच मोठे बदल;काय होणार स्वस्त तर काय होणार महाग ?
चित्रपटाबाबत दिग्दर्शक स्वरूप सावंत म्हणाले की, आज सगळीकडे गणेशात्सवाचा जल्लोष आहे. ‘देवघर ऑन रेंट’ या चित्रपटाच्या शीर्षकातच देव दडला असल्याने श्री चिंतामणीच्या दरबारात टिझर प्रदर्शित झाल्याचा खूप आनंद आहे. हा चित्रपट जरी आजची गोष्ट सांगणारा असला तरी यातील आध्यात्माचा धागा अतिशय महत्त्वाचा असल्याचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी स्पष्ट केले.
चित्रपटात ‘हे’ कलाकार दिसणार (Devghar On Rent Movie)
या चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चावरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, चेतन रायकर, सिद्धेश्वर झाडबुके आणि गौतमी पाटील आदी कलाकार आहेत. चैतन्य साळुंखे यांनी छायाचित्रण केले असून, दिलीप कंधारे कला दिग्दर्शक आहेत. संगीतकार एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी या चित्रपटातील गीतांना सुमधूर संगीत दिले आहे. हा चित्रपट २८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.