नगर : बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर हा नेहमीच वेगवगळ्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. आता त्याच्या धर्मा प्रोडक्शनचा नवीन चित्रपट ‘धडक-2′ (Dhadak 2) ची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाची एक पोस्टर यावेळी प्रदर्शित करण्यात आले असून रिलीज डेट देखील यावेळी घोषित करण्यात आली आहे. चित्रपटाच्या या ग्राफिकल पोस्टरमध्ये कथानकाची झलकही दिसून येत आहे. ‘धडक-२’ मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी (Triptii Dimri) हे लीड रोलमध्ये असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इक्बाल करणार आहेत.
नक्की वाचा : कोलकाताची तिसऱ्यांदा ‘आयपीएल’च्या जेतेपदावर मोहोर; हैदराबादला नमवले
निर्माता करण जोहर याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ केला शेअर (Dhadak 2 Movie)
निर्माता करण जोहर याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली. या व्हिडीओसोबत करण जोहरने, ही गोष्ट थोडी वेगळी आहे. एक होता राजा आणि एक होती राणी,त्यांची जात वेगळी होती गोष्ट संपली. (‘यह कहानी थोड़ी अलग है, क्योंकि एक राजा था और एक रानी थी, जाति अलग थी… कहानी खत्म।’). या व्हिडीओच्या अखेरीस , ‘हो यारा दुनिया अलग है मेरी तुम्हारी, कैसे मिलेंगे आग और पानी।’ असे गाण्याचे शब्द आहेत. ‘धडक’ चित्रपटातही जातीवादात अडकलेल्या प्रेमावर भाष्य करण्यात आले.
अवश्य वाचा : मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; कोकण विभाग सर्वात अव्वल
जाती व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट (Dhadak 2 Movie)
‘धडक-२’ च्या माध्यमातून कारण जोहर पुन्हा एकदा जाती व्यवस्थेवर भाष्य करणार आहे. झी स्टुडिओ, धर्मा प्रोडक्शन आणि क्लाउड ९ पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत निर्मिती होत असलेला हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे. ‘धडक’ हा चित्रपट मराठीमधील सैराट या चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केले होते. जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता धडक २ काय धमाल करणार हे पाहणे गरजेचे आहे.