Dhananjay Munde : नगर : जो पोलिसांचा (Police) बाप काढतो, तो उद्या निवडून आल्यावर तुमचा बाप काढायला सुद्धा कमी करणार नाही, अशी टीका कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांचे नाव न घेता केली. पारनेर तालुक्याने जी चूक केली, ती चूक आता तुम्ही करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
हे देखील वाचा : गरिबांचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट; पंतप्रधान माेदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबाेल
यांची उपस्थिती
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील महायुतीच्या प्रचार सभेत ते बाेलत हाेते. यावेळी आमदार मोनिका राजळे, चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, दत्ताभाऊ पानसरे, नंदू मुंडे, अरूण मुंडे, एकनाथ खटाळ आदी उपस्थित होते.
नक्की वाचा: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मे पर्यंत वाढ
मुंडे म्हणाले (Dhananjay Munde)
”उभा देश म्हणतोय, की देशाला मोदींशिवाय पर्याय नाही. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर जिल्हा हा देशातील पहिल्या दहा प्रगत जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही. मोदी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आल्याचा आनंद होत आहे. ७० वर्षात ज्यांनी सत्ता भोगली, त्यांनी केवळ लोकांची फसवणूक केली. तर पंतप्रधान मोदी यांनी ८० टक्के लोकांना मोफत धान्य देऊन त्यांची भूक भागवली आहे.”