Dhananjay Munde : बहुरुपी उमेदवारावर विश्वास ठेवू नका, अन्यथा पस्तावा करण्याची वेळ : धनंजय मुंडे

Dhananjay Munde : बहुरुपी उमेदवारावर विश्वास ठेवू नका, अन्यथा पस्तावा करण्याची वेळ : धनंजय मुंडे

0
Dhananjay Munde
Dhananjay Munde : बहुरुपी उमेदवारावर विश्वास ठेवू नका, अन्यथा पस्तावा करण्याची वेळ : धनंजय मुंडे

Dhananjay Munde : नगर : विराेधकांना गेल्या सत्तर वर्षात देशाचा विकास करता आला नाही, ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर आरोप करत आहेत. परंतु, महायुती सरकार सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी देखील नगरचा विकास गतिमान केला आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांना मतदान करून देशाला पुढे नेण्याचे काम करावे. समोरचा उमेदवार हा बहुरूपी उमेदवार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवू नका, अन्यथा पस्‍तावा करण्‍याची वेळ तुमच्‍यावर येईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले.

हे देखील वाचा: वकिलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी गजाआड

राहुरी शहरात प्रचार सभा (Dhananjay Munde)

नगर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राहुरी शहरातून प्रचार रॅली आणि त्‍यानंतर आयोजित केलेल्‍या जाहीर सभेत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजीमंत्री शिवाजी कर्डिले, डॉ. सुजय विखे पाटील, रावसाहेब तनपुरे, उत्तमराव म्हसे, नामदेव ढोकणे, तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, उदयसिंह पाटील आदी उपस्थित हाेते. मुंडे म्हणाले, ”जगात पत आणि प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला मिळवून दिली आहे. देशाचा अभिमान ज्याला असेल, त्याने येत्या १३ तारखेला देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी व्हावेत, यासाठी मतदान करावे, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे. 

नक्की वाचा: भारतातील लोकशाही संकटात : पवार

डॉ. विखे पाटील म्‍हणाले (Dhananjay Munde)

”पाच वर्ष आमदार असताना त्यांना पारनेरचा विकास साधता आला नाही. ते आता जिल्ह्याच्या विकासाची भाषा करत आहेत. मात्र, आम्ही गेली सहा वर्ष जनतेच्या बरोबर राहून जिल्ह्याचा विकास साधला आहे. राहुरी तालुक्याने विखे पाटील कुटुंबावर नितांत प्रेम केले आहे. याही निवडणुकीमध्ये हे प्रेम तसेच राहणार आहे. समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्‍याचे काम राहुरीची जनता करणार आहे.” माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले, ”राहुरी तालुका एक नंबरचे लीड देईल, यात शंका नाही. भाजपाच्या माध्यमातून मोठा विकास तालुक्‍यात झाला आहे. नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here