Dhananjay Munde : अहिल्यानगर : महाराष्ट्राच्या राजकारणात (Politics) सर्वात चर्चेत असलेले नेते म्हणजे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे आहेत. त्यांच्या अडचणी वाढतच जाताना दिसून येत आहेत. आता मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरले आहेत. करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी त्यांच्याविरोधात घरगुती हिंसाचाराप्रकरणी जी तक्रार केली होती, त्यावर न्यायालयाने निर्णय देत धनंजय मुंडे हे दोषी असल्याचं सांगितलं आहे. वांद्रे येथील कौटुंबीक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
अवश्य वाचा : “भारतात नॉन-व्हेजवर बंदी घालायला पाहिजे”; अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य
दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश
करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशत: मान्य केले आहेत. करूणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश फॅमिली कोर्टाने दिले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा करुण शर्मा यांचा दावा होता. त्यासाठी मागच्या काही वर्षापासून त्या कायदेशीर लढाई लढत होत्या. आज त्यांना यश मिळालं आहे. फॅमिली कोर्टाने करुणा शर्मा यांचा दावा मान्य केला आहे. करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत हे कोर्टाने मान्य केलय.
नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी सरकारचा मोठा निर्णय
करुणा मुंडे यांच्या वकिलाने म्हटले की, (Dhananjay Munde)
करुणा मुंडे यांना मासिक १ लाख २५ हजार आणि मुलगी शिवानी मुंडेला तिच्या लग्नापर्यंत मासिक ७५ हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.