Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना मस्साजोग प्रकरणात सहआरोपी करा; कर्जतमध्ये रास्ता रोको

Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना मस्साजोग प्रकरणात सहआरोपी करा; कर्जतमध्ये रास्ता रोको

0
Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना मस्साजोग प्रकरणात सहआरोपी करा; कर्जतमध्ये रास्ता रोको
Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना मस्साजोग प्रकरणात सहआरोपी करा; कर्जतमध्ये रास्ता रोको

Dhananjay Munde : कर्जत : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच या प्रकरणातील आरोपींना राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा पाठींबा असल्याने त्यांना सदरच्या खटल्यात सहआरोपी करुन तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) चौकात कर्जत सकल मराठा समाजाच्यावतीने (Maratha Society) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनास प्रमुख समन्वयक रावसाहेब धांडे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना मस्साजोग प्रकरणात सहआरोपी करा; कर्जतमध्ये रास्ता रोको
Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना मस्साजोग प्रकरणात सहआरोपी करा; कर्जतमध्ये रास्ता रोको

अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार

माणूसकीला काळीमा फासत हत्या

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे आणि माणूसकीला काळीमा फासत हत्या करण्यात आली. सदरच्या घटनेला दोन महिने पूर्ण होत असताना आजमितीस हत्येतील मारेकरी अजूनही फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करताना त्यांना अमानुषपणे मारहाण करीत मानवतेला लाजवेल असे कृत्य करुन त्यांची हत्या झाली. पोलिसांनी आरोपपत्रात दाखल केलेल्या व्हिडीओ आणि फोटोत हे सिद्ध होत आहे.

Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना मस्साजोग प्रकरणात सहआरोपी करा; कर्जतमध्ये रास्ता रोको
Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना मस्साजोग प्रकरणात सहआरोपी करा; कर्जतमध्ये रास्ता रोको

नक्की वाचा : पूर्ववैमनस्यातून अपहृत तरुणाचा खून; आणखी पाच आरोपी ताब्यात

मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी (Dhananjay Munde)

सदरचा खटला फास्ट ट्रक कोर्टात खटला चालवत मारेकऱ्यांना तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी. तसेच हत्येचा मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा व विश्वासू कार्यकर्ता आहे. त्याला राजकीय वरदहस्त असल्याचे दिसते. या गंभीर प्रकरणात धनंजय मुंडेंना देखील सहआरोपी करीत अटक करावी. यासह त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज कर्जतच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाज कर्जत तालुक्याचे प्रमुख समन्वयक रावसाहेब धांडे यांनी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे यांना वरील आशयाचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.