नगर : मनोज जरांगे यांना धमकी दिल्याप्रकरणी आपली बदनामी होत असल्याचा दावा करत माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुंडे यांनी स्वतःची, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आणि या प्रकरणात पकडलेल्या आरोपींची ब्रेन मॅपिंग (Brain Mapping) व नार्को टेस्ट (Narco Test) करण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असल्यास, ती मिळवण्यासाठी स्वतः वकील लावून प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. सत्य काय आहे हे जनतेसमोर यावे,अशी त्यांची भूमिका आहे.
नक्की वाचा: धनंजय मुंडेंनी मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील केली ;मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
‘मनोज जरांगे यांना वाटते की,धनंजय मुंडे या पृथ्वीतलावरच नसावेत’ (Dhananjay Munde)
धनंजय मुंडे म्हणाले की, मी ५ वर्ष विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. त्यावेळी मी मराठा आरक्षणासाठी सभागृह बंद केले. नगर जिल्ह्यात कोपर्डीला मी पहिली भेट दिली. यावेळी मी आरोपी अटक होईपर्यंत सभागृह चालू दिले नाही. ८० हजार कुणबी प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात वाटले. मी मनोज जरांगे यांचे उपोषण देखील सोडवले आहे. १७ तारखेची सभा सोडली तर मी एकदाही त्यांच्यावर कधीही आरोप केले नाहीत. मनोज जरांगे यांना वाटते की, धनंजय मुंडे या पृथ्वीतलावरच नसावेत. मराठा समाजाला ओबीसी की ईडब्ल्यूएसमधून फायदा आहे याचे उत्तर आतापर्यंत जरांगे यांनी दिले नाही.
अवश्य वाचा: पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया;म्हणाले मी…
‘माझी आणि जरांगेंची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा’ (Dhananjay Munde)
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, आता तयार झालेली पिलावळ कोणाची आहे. आम्हाला कोणीही काही बोलले तरी आम्ही गप्प बसतो. मला तर तलवार घेऊन मारायाला आले होते. ईडब्ल्यूएस की ओबीसीमध्ये जास्त आरक्षण मिळते हे समोरासमोर येऊन होऊन जाऊ द्या. तुम्ही हाके, वाघमारे यांना मारलं. तुमची मारामारीची प्रवृत्ती आहे. तुम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लाऊ नका, इतकेच आमचे म्हणणे आहे. मी अनेकांना बाजूला जाऊन भेटतो, यातून काय कट रचला जातो? हे सगळे तुमचे कार्यकर्ते आहेत. माझी अशी इमेज तयार केली जात आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे. माझी ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा. जरांगे आणि आरोपींचीही करा,अशी मागणी त्यांनी यावेळी केली.



