Dhananjay Munde:’मनभेद विसरून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहू’- धनंजय मुंडे

0
Dhananjay Munde:'मनभेद विसरून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहू'- धनंजय मुंडे
Dhananjay Munde:'मनभेद विसरून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहू'- धनंजय मुंडे

नगर : बीड (Beed District) जिल्ह्याच्या विकासाचे वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Deputy Chief Minister Sunetra Pawar)यांच्या नेतृत्वाखाली वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी योगदान देऊ, अशी भावनिक साद माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घातली आहे.

नक्की वाचा: राहुरी नगरपरिषदेचा मोठा ठराव;दीड तास मोबाईलसह मनोरंजनांची माध्यमे राहणार बंद

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडली. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा नियोजन समितीची ही पहिलीच बैठक असल्याने वातावरण भावनिक होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडल्यानंतर उपस्थितांना उद्देशून ही भावनिक साद दिली. 

अजितदादांचा मला कायम वडिलकीचा आधार – मुंडे  (Dhananjay Munde)

मुंडे म्हणाले की, “स्व. अजितदादा हे मला कायम वडिलकीचा आधार देणारे होते. माझे आणि त्यांचे नाते अतिशय वेगळे होते. त्यांच्या अकाली जाण्याने केवळ वैयक्तिक नाही तर जिल्ह्याचेही मोठे नुकसान झाले आहे.” दादांनी अल्प काळात बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते, असे सांगत मुंडे यांनी काही योजनांचा विशेष उल्लेख केला. 

अवश्य वाचा: महायुती सरकारचा यू टर्न! शासकीय रुग्णालयात यापुढेही मोफतच उपचार  

अजितदादांनी मला स्वतः शब्द दिला होता…(Dhananjay Munde)

ते पुढे म्हणाले की, संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात ११ वसतिगृहांच्या उभारणीसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या संदर्भात अजित पवार यांनी स्वतः मला शब्द दिला होता, अशी आठवणही धनंजय मुंडे यांनी उपस्थितांसमोर सांगितली.