Dhananjay Munde: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Satosh Deshmukh) यांची हत्या झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या जवळचे असेलेले वाल्मिक कराड (Valmik Karad) यांचेही नाव समोर येत आहे. कराड यांचे नाव घेत विरोधक धनंजय मुंडेंना यावरून लक्ष्य करत आहेत.आज कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातील आरोपींना फाशी (Execution) द्यावी,असे म्हटले आहे. याचबरोबर या प्रकरणात माझ्या जवळचा कोणी असेल तर त्यालाही सोडून नका असे ते म्हटले आहेत.
नक्की वाचा : राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस;हवामान विभागाचा अंदाज
‘ज्यांनी कोणी हे केले ते फासावर जायला पाहिजेत’ (Dhananjay Munde)
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुंडे म्हणाले की, “जिथे माझी बैठक होती, तिथेच मुख्यमंत्र्यांचीही बैठक होती. त्यावेळी योगायोगाने आमची भेट झाली. ज्या देशमुखांची हत्या झाली आणि ज्यांनी कोणी हे केले ते फासावर जायला पाहिजेत,या मताचा मी आहे. ते शेवटी माझ्या जिल्ह्यातील एक सरपंच होते. मलाही त्यांच्याबाबतीत तेवढाच आदर आहे. जे कोणी गुन्हेगार आहेत, त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा. मग तो कोणाच्याही जवळचा असो. अगदी माझ्या जवळचा असेल तर त्यालाही सोडायचे नाही म्हणत असताना, माझ्यावर आरोप करण्यामागे काय राजकारण असेल हे आपण समजू शकता, असं त्यांनी यावेळी म्हटले आहे.
अवश्य वाचा : मराठी सिनेमांना थियटर मिळत नसल्यानं तेजश्री प्रधाननं व्यक्त केली खंत!
काय आहे प्रकरण ? (Dhananjay Munde)
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर त्यांचे कुटुंबिय,निकटवर्तीय व मित्र परिवाराने त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते कुठेच आढळून आले नाहीत. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला होता.