Dhanashree Vikhe Patil : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणार – धनश्री विखे पाटील

Dhanashree Vikhe Patil : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणार - धनश्री विखे पाटील

0
Dhanashree Vikhe Patil : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणार - धनश्री विखे पाटील
Dhanashree Vikhe Patil : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणार - धनश्री विखे पाटील

Dhanashree Vikhe Patil : नगर : दिव्यांग (Divyang) विद्यार्थ्यांच्या कला गुणांसाठी व करिअरसाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे (Dr. Vitthalrao Vikhe Patil Foundation) जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहे. दिव्यांग विद्यार्थी हा क्रीडा स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी प्रशिक्षणाची खरी गरज आहे. त्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली असून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही, तरी शिक्षक, पालक यांनी पुढाकार घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम आपण सर्वजण मिळून करू लवकरच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन स्पेशल ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्र अध्यक्ष धनश्री विखे पाटील (Dhanashree Vikhe Patil) यांनी केले.

नक्की वाचा : नगरकरांसाठी मोठी बातमी…जिल्ह्यात साडेतीन हजार कोटींचे प्रकल्प उभारले जाणार…

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन

विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे जिल्हा दिव्यांक पुनर्वसन केंद्र व स्पेशल ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्र तसेच जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग अहिल्यानगर यांच्यातर्फे जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन स्पेशल ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, पी एम गायकवाड, वसंत कापरे, डॉ. अभिजीत दिवटे, दीपक अनाप, डॉ. अभिजीत मिरीकर, विक्रांत येवले सुनील कोल्हापुरे आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : ‘मराठ्यांना हाल हाल करुन मारणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही’- मनोज जरांगे

सहाय्यक समाज कल्याण अधिकारी म्हणाले की, (Dhanashree Vikhe Patil)

सहाय्यक समाज कल्याण अधिकारी प्रवीण पोरगंंटीवार म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थी हा स्पर्धेच्या माध्यमातून घडला जातो त्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देणे गरजेचे आहे. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनने प्रशासनाला काम करताना केलेल्या मदतीमुळे विद्यार्थी नक्कीच घडतील. आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम डॉ. विखे पाटील फाउंडेशनने केले आहे, असे त्यांनी सांगितले.

Dhanashree Vikhe Patil : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणार - धनश्री विखे पाटील
Dhanashree Vikhe Patil : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणार – धनश्री विखे पाटील


दीपक अनाप म्हणले की, जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या २८ शाळा सहभागी झाल्या असून ४१० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. यामध्ये रनिंग, गोळाफेक, स्विमिंग आदींसह सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पेशल ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष धनश्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वसंत कापरे यांचे भाषण झाले व देविदास कोकाटे यांनी आभार मानले.