नगर: बीड जिल्ह्यातील गेवराई येथे नर्तिकेच्या (Dancer) नादातून युवकाने आपलं जीवन संपवल्याची घटना घडलेली असतानाच आता धाराशिवमध्ये (Dharashiv) कला केंद्रातील महिलेसोबत प्रेमसंबंधातून (Love affair) वाद झाल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Youth commits suicide by hanging) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अश्रुबा कांबळे असं मृत युवकाचं नाव आहे. दोघेही एकत्रितपणे देवदर्शनासाठी गेले होते. त्यानंतर तरुणाने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.
नक्की वाचा: फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
नेमकं काय घडलं ? (Dharashiv Sucide News)
धाराशिवमधील साई कला केंद्रमध्ये नृत्य काम करणाऱ्या महिलेचा तिच्या प्रियकरासोबत वाद झाला. त्यामध्ये, प्रियकराने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, धक्कादायक बाब म्हणजे या धमकीनंतर काही वेळातच प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली.अश्रुबा अंकुश कांबळे (वय २५) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अश्रुबा कांबळे रुई ढोकी गावचा रहिवाशी आहे. गेल्या ५ वर्षापासून कला केंद्रातील नर्तिका आणि त्याच्यात अनैतिक प्रेम संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. मृत तरुण आणि तरुणी शिखर शिंगणापूर येथे काल देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन करून परतत असताना दोघांमध्ये वाद झाला.
अवश्य वाचा: एक गाव एक पाणवठ्याचा राखणदार गेला;कोण होते बाबा आढाव?
आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात (Dharashiv Sucide News)
देव दर्शनावरुन परत येत असताना मृत प्रियकराच्या बायकोचा फोन आला म्हणून नर्तिका आणि अश्रुबा यांच्या वाद झाला होता. त्यानंतर,मी आत्महत्या करतो म्हणून धमकी देत तो निघून गेला. मात्र, प्रियसीने अश्रुबाच्या या धमकीडे दुर्लक्ष करत गांभीर्याने विचार केला नाही. तर,अश्रुबाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची उघडकीस आले. धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पोस्टमार्टम करून त्यांनी मृत व्यक्तीचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी, येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या घटनेने धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून महिलेने त्रास दिला का, याचाही तपास पोलीस करत आहेत.



