Dharma-The AI Story : मराठीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर येणार चित्रपट

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

0
Dharma-The AI Story
Dharma-The AI Story

नगर : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) या नावाने प्रत्येक क्षेत्रात खळबळ माजवली आहे. सध्या याचा प्रभाव मर्यादित आहे, परंतु येत्या काही दिवसांत चॅट जीपीटी (Chat GPT) आणि गुगल बोर्डचा वापर असाच वाढत राहिला, तर मोठं नुकसान सहन करावं लागेल. याच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा लवकरच आगामी चित्रपट रिलीज होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला आहे.

नक्की वाचा : घरच्या मैदानावर मुंबईचा चेन्नईकडून पराभव; रोहित शर्माची शतकी खेळी व्यर्थ
 

‘धर्मा- दि एआय स्टोरी’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात (Dharma-The AI Story)

एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित  ‘धर्मा- दि एआय स्टोरी’चे  पुष्कर जोग दिग्दर्शक आहेत. पुष्कर जोग यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके विषय दिले आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा नाविन्यपूर्ण असतो, त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल. तेजल पिंपळे या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. तर पुष्कर  जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यादांच नवा प्रयोग (Dharma-The AI Story)

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात,” मराठी मनोरंजन विश्वात हा प्रयोग पहिल्यादांच होत आहे. या चित्रपटाचा विषय नवीन असून यामध्ये तुम्हाला अनेक नवीन गोष्टी दिसतील. हा विषय एआयवर आधारित आहे. कसा एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते. आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहाण्यासाठी धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या बापाची कहाणी यात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात सुरू झाली असून सप्टेंबर महिन्यात ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येईल.” आतापर्यंत आपण एआय टेक्नॉलॉजी आपण फक्त सोशल मीडिया आणि इतर वेगवेगळ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर पाहिली होती. आता हाच विषय थेट आपल्याला मराठी चित्रपटात पाहायला मिळणार असल्याने ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ विषयीची उत्सुकता आता वाढलेली दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here