Dharmaveer : किल्ले धर्मवीरगड ते राजधानी रायगड ‘धर्मवीर’ रथयात्रा उत्साहात

0
Dharmaveer

Dharmaveer : नगर : महाराष्ट्रातील गडकिल्ले अभ्यासपूर्ण भटकंती, संवर्धन व ऐतिहासिक (Historical) वारसा जतन करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवारातर्फे यावर्षी प्रथमच शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड (Fort Raigad) अशी रथयात्रा काढण्यात आली. श्रीगोंदा तालुक्यातील किल्ले धर्मवीर (Dharmaveer) गडावरून शनिवारी (ता. १०) रोजी निघालेली ही रथयात्रा २५० किमी. प्रवास करून स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथील महादरवाजा येथे पोहचली. शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी सर्वांना गडाची माहिती देऊन श्रीगोंदे आणि रायगड ऋणानुबंध उलगडून सांगितला व किल्ले रायगडावर स्वच्छता मोहीम राबवली.

हे देखील वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रात एकही सभा होऊ देणार नाही; मराठे काय आहे हे १५ तारखेनंतर पाहा, मनोज जरांगेंचा इशारा

श्रीगोंदे आणि रायगड ऋणानुबंध जपणे श्रीगोंदेकरांचे कर्तव्य (Dharmaveer)


श्रीगोंदे तालुक्यातील एकमेव किल्ला धर्मवीरगड म्हणजेच पांडे पेडगावचा बहादूरगड! श्रीगोंदेकरांचे इमान नेहमीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी होते. म्हणूनच राजधानी रायगडाच्या एका टोकाला छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘श्रीगोंदे टोक’ नाव दिले होते. श्रीगोंदे आणि रायगड ऋणानुबंध जपणे श्रीगोंदेकरांचे कर्तव्य आहे, या उदात्त हेतूने शिवदुर्गचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली ही धर्मवीर रथयात्रा श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व किल्ले धर्मवीर गडाच्या शौर्य स्तंभास मानवंदना देऊन मार्गस्थ झाली. या मार्गावरील गावांमध्ये जागोजागी धर्मवीर रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. अवघ्या ६ वर्षांचा आदित्य भरत खोमणे व अमीर शेख यांनी फक्त २५ मिनिटांत सर्वप्रथम किल्ला सर केला.

नक्की वाचा: मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यात बंदची हाक

मार्गावरील प्लॅस्टिक गोळा करून गडाखाली आणले (Dharmaveer)


हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवदुर्ग शिलेदार संकेत नलगे, गोरख नलगे, महेश नलगे, गोरख कडूसपाटील, प्रा.भरत खोमणे, डॉ. चंद्रशेखर कळमकर, गणेश कुदांडे, अक्षय गायकवाड, अमोल बडे, अतुल क्षिरसागर, सागर घाडगे, सचिन भोसले, विकास जगताप, विकास आढाव, अभिजीत आढाव, सागर आढाव, नवनाथ आढाव, अक्षीका इंगळे, अमोल गावडे, प्रथमेश मोरे, सुनिल दत्तात्रय मोरे, आशीष जगताप, संगीता इंगळे, तारा चांदगुडे, रुक्मिणी कुदांडे, दिलीप गायकवाड, शंभू गायकवाड यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित १०१ मावळे व रणरागिणींनी परतीच्या मार्गावरील प्लॅस्टिक गोळा करून गडाखाली आणले. चित्त दरवाजा महाड येथील कचरा संकलित करणाऱ्या व्यक्तींकडे प्लॅस्टिकने भरलेल्या १४ गोण्या सुपूर्द करण्यात आल्या.

”अनेकजण फक्त गड फिरायला जातात. पण आम्ही सलग सात वर्ष रायगड समजुन घ्यायला जात आहोत. इतिहास काळापासून असणारा श्रीगोंदे आणि रायगड ऋणानुबंध जपण्यासाठी यावर्षी प्रथमच धर्मवीर पालखी सोहळा आयोजित केला होता. त्यास मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आम्ही छत्रपती संभाजी महाराजांसाठी काहीतरी करू शकलो. याचं मोठं समाधान आहे”.

  • डॉ. चंद्रशेखर कळमकर
    उपाध्यक्ष, शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here