Dharmaveer Fort : धर्मवीर गडावर बलिदान स्फूर्ती दिन साजरा

Dharmaveer Fort : धर्मवीर गडावर बलिदान स्फूर्ती दिन साजरा

0
Dharmaveer Fort

Dharmaveer Fort : श्रीगोंदा: छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्ताने धर्मवीरगड (Dharmaveer Fort) पेडगाव येथे सेवा समितीच्या वतीने साजरा करत छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

नक्की वाचा : लाेकसभा निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून ईडीकडून जाणून बुजून कारवाई; शरद पवार यांची टीका

शिवशंभू विचारांचा जागर (Dharmaveer Fort)


आरती रणसिंग, सचिन बिडवे, शिवकवी वैभव साळुंखे, शंभू व्याख्याते राकेश पिंजण यांनी शिवशंभू विचारांचा जागर केला. यावेळी सामाजिक उल्लेखनीय योगदानासाठी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप व समाजसेवक यशवंत गोसावी, पुरातत्व विभाग विजय कुमार धुमाळ, शासकीयसाठी पनवेल उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नवले, वैद्यकीय डॉ. सुजाता भोसले, युवा उद्योजक शुभम वाडगे यांना शंभूगर्जना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच श्री छत्रपती प्रतिष्ठान श्रीगोंदा फॅक्टरी, दुर्गमित्र परिवार मुंबई, सह्याद्रीचे भुते सामाजिक संस्था, शिवक्रांती मोटिवेशनाल अकॅडमी, महा. राज्य यांना विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आले.

हे देखील वाचा : नीलेश लंके म्हणाले, अजून काही ठरलं नाही

मराठा मावळ्यांच्या वंशजांची उपस्थिती (Dharmaveer Fort)

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह बाजी मोहिते, येसाजी कंक यांचे वंशज आकाश कंक व नेतोजी पालकर यांचे वंशज गणेश पालकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी घनश्याम शेलार, डॉ. प्रणोती जगताप, शुभांगी पोटे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, ज्योती खेडकर, सीमा गोरे, प्रतिभा झिटे, मिरा शिंदे, सुवर्णा पाचपुते, इरफान पिरजादे, आदेश नागवडे, डॉ. निलेश खेडकर, बाळासाहेब धोत्रे यांच्यासह शंभूप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शंकर जाधव, भारती इंगावले, प्रविण झांबरे, आरती रणसिंग, आनंद लगड, माया खेंडके, सोनाली शिंदे, वंदना भापकर, लक्ष्मण वनपुरे आदींनी परिश्रम घेतले. आकाश शिंदे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. सुनील गायकवाड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here