Dharmaveergad : श्रीगोंदा : तालुक्यातील धर्मवीरगड (बहादूरगड) (Dharmaveergad) पेडगाव येथे सेवा समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या बलिदान दिनानिमित्ताने बलिदान स्फूर्ती दिन (Balidan Din) साजरा करण्यात आला.
नक्की वाचा : नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
शंभुराजेंची रक्त सांडले तिथे रक्तदान शिबिर घेऊन आदरांजली
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून झाली. शंभुराजे यांचे रक्त सांडले तिथे रक्तदान शिबिर घेऊन राजेंना आदरांजली अर्पण करण्यात आली. समितीचे प्रवक्ते देवयानी घरत, अमित मरळीकर, व्याख्याते खंडुजी डोईफोडे व राकेश दादा पिंजण सरकार यांनी शिवराय आणि शंभुराजे यांच्या विचारांचा जागर केला. सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे व सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज धैर्यशील जेधे यांनी मनोगत व्यक्त केले. हिंदुराजा मर्दानी आखाडा संगमनेर यांच्या मावळ्यांनी शिवकालीन मर्दानी खेळांची डोळ्याची पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर करून सर्वांना शिवकाळात घेऊन गेले. छावा ट्रेकिंग ग्रुपच्या वतीने मेजर नवनाथ खामकर यांच्या मार्गदर्शनात श्रीगोंदा ते धर्मवीर गड सायकल वारी काढण्यात आली होती.
अवश्य वाचा : राहुरी नगरपरिषदेची पोलीस बंदोबस्तात पक्क्या अतिक्रमणांवर कारवाई
शंभूगर्जना पुरस्कार देऊन सन्मानित (Dharmaveergad)
यावेळी सामाजिक, शैक्षणिक, शासकीय वैद्यकीय क्षेत्रातील निस्वार्थ उल्लेखनीय योगदानासाठी रमेश सातव, सुलक्षणा शिलवंत (धर) यांना शंभूगर्जना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर अजय वेलनेस परिवार श्रीगोंदा, जय जवान जय किसान बहुउद्देशीय संस्था लिंपणगाव व शिवाजीराव भोस यांना विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आले. यावेळी डॉ. प्रतिभा पाचपुते, डॉ. प्रणोती जगताप, कल्याणी लोखंडे, दिग्विजय नागवडे, अशोक खेंडके, रवींद्र गोंदकर, आदेश नागवडे, ॲड. स्वाती जाधव, गणेश झिटे, डॉ.जांभळे, डॉ. देशमुख, डॉ. कदम, मीरा शिंदे, नवनाथ खामकर, राजेंद्र नागवडे, डॉ. कोकाटे, पेडगावचे सरपंच इरफान पिरजादे, डॉ. निलेश खेडकर, परेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सचिव आकाश शिंदे, प्रवक्ते आरती रणशिंग व अहिल्यानगर संघटक सुनील गायकवाड यांनी केले.