नगर: महाराष्ट्र बारव मोहिम अंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन (Shivdurg Trekkers Foundation) व शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीकडून श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावच्या किल्ले धर्मवीरगड (Fort Dharmavirgad) येथील पुरातन हत्तीमोट बारवेची स्वच्छता (Cleaning) करण्यात आली. महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि बारव संवर्धन कार्य करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व वारसा संवर्धन समितीचे उपाध्यक्ष दिगंबर भुजबळ यांच्या नियोजनात ही मोहिम पार पडली.
नक्की वाचा : पूजा खेडकरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश
शिवदुर्ग फाऊंडेशनकडून बारव स्वच्छता अभियान (Dharmaveergad)
श्रीगोंदा तालुक्यात एकूण ११५ बारवा आहेत. गेल्या चार वर्षांपासून शिवदुर्ग परिवार बारव स्वच्छता अभियान राबवत आहे. मागील काही दिवसांपासून धर्मवीरगडावर पर्यटकांचा ओढा वाढला आहे. मात्र, भीमा नदीच्या काठावर असलेल्या पुरातन हत्ती मोट बारवेला काटेरी झुडपे व गवताचा विळखा पडलेला होता. संपुर्ण बारव नजरेस पडत नव्हती. महाराष्ट्रातून असंख्य पर्यटक व अभ्यासक धर्मवीरगडाला भेट देतात. मात्र सुकलेले लांब गवत व काटेरी झुडपामुळे संपुर्ण हत्तीमोट बारवचे दर्शन होत नव्हते. त्यामुळे शिवदुर्ग परिवाराच्या सदस्यांनी ही बारव स्वच्छता मोहीम राबवली.
अवश्य वाचा : ‘आम्ही एकत्र येणं कठीण नाही’;उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर
काटेरी झुडपे तोडून बारवेच्या आतील भाग स्वच्छ करून पायउतार रस्ता मोकळा केला. या मोहिमेत उपाध्यक्ष सचिन भोसले, अमोल बडे, प्रा. भरत खोमणे, प्रणव गलांडे, तुषार चौधरी, ॲड.गोरख कडूस, अक्षय ओहळ, सागर शिंदे, दिगंबर भुजबळ, डॉ. स्मिता तरटे, शंभुराजे कडूस, शिव कडूस, कुणाल खोमणे, आदित्य खोमणे यांनी सहभाग नोंदवला.