Dharmendra Passed Away:बॉलिवूडचा ‘ही मॅन’ हरपला! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन

0
Dharmendra Passed Away: बॉलिवूडचा 'ही मॅन' हरपला! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन
Dharmendra Passed Away: बॉलिवूडचा 'ही मॅन' हरपला! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन

नगर : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि ‘ही मॅन’ (He-Man)म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे निधन (Dharmendra Passed Away) झाले आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या जाण्याने त्यांचे चाहते, सहकलाकार आणि कुटुंबातील सदस्यांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. सिनेसृष्टीपासून ते राजकीय वर्तुळातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

धर्मेंद्र बऱ्याच काळापासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना घरी देखील सोडण्यात आले. घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र,आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेत. त्यांच्या अंत्यदर्शनाला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते.

नक्की वाचा: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ

धर्मेंद्र यांची सिने कारकीर्द ? (Dharmendra Passed Away)

धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ते “दिल भी तेरा हम भी तेरे” मध्ये दिसले. यानंतर १९६१ मध्ये आलेल्या ‘बॉय फ्रेंड’ चित्रपटात सहाय्यक भूमिकेत धर्मेंद्र प्रेक्षकांच्या भेटीला आले. ६५ वर्षे अभिनय क्षेत्रात काम करताना धर्मेंद्र यांनी अनेक हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्यांनी शोले, चुपके चुपके, सीता और गीता , धरमवीर , फूल और पत्थर, जुगनू यादों की बारात सारखे चित्रपट केले आहे. धर्मेंद्र यांचा एक चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही, ज्यात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत असून, “इक्कीस” असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट२५ डिसेंबर २०२५रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अवश्य वाचा: एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री शिंदेंचा लाडक्या बहिणींना शब्द  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली (Dharmendra Passed Away)

भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोकभावना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. स्वप्नाळू, युवा नायक ते तडफदार-बलंदड नायक म्हणून साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि पुढे बॉलिवुडचा हि-मॅन म्हणून लौकीक मिळवेलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र चित्रपट रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.