Dharmveer Gad : काजल दरेकर-जंजिरे यांचे आंतरराष्ट्रीय मंचावर दमदार सादरीकरण; धर्मवीर गडाला जागतिक ओळख

Dharmveer Gad : काजल दरेकर-जंजिरे यांचे आंतरराष्ट्रीय मंचावर दमदार सादरीकरण; धर्मवीर गडाला जागतिक ओळख

0

Dharmveer Gad : श्रीगोंदा : काष्टी येथील काजल दरेकर-जंजिरे (Kajal Darekar-Janjire) हिने दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत (International Conference) पेडगावच्या धर्मवीर गडावर (Dharmveer Gad) संशोधन पत्र सादर करत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाला जागतिक व्यासपीठ मिळवून दिले. तिच्या या कामगिरीमुळे स्थानिक इतिहासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

नक्की वाचा : वादात असलेली जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ

धर्मवीर गडाचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा सखोलपणे मांडला

‘वेळ, प्रदेश आणि भूभाग’ या विषयांतर्गत सादर केलेल्या संशोधनात धर्मवीर गडाचा ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक वारसा सखोलपणे मांडण्यात आला. किल्ल्याची स्थापत्य रचना, रणनीतिक महत्त्व तसेच स्थानिक परंपरा आणि लोकजीवनावर झालेला प्रभाव यावर विशेष भर देण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सादरीकरणातून उलगडला इतिहास (Dharmveer Gad)

संशोधनानुसार, गडावरील शिवमंदिरे आणि पाण्याच्या मोटेच्या स्थापत्य शैलीवरून हा किल्ला यादवकालीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच इ.स. १६६० मध्ये औरंगजेबाने या गडाचा लष्करी तळ म्हणून वापर करत ‘बहादूर गड’ असे नामकरण केल्याचा इतिहासही या सादरीकरणातून उलगडण्यात आला.

आजही गडाच्या भिंती, बुरुज आणि अवशेष इतिहासाच्या खुणा जिवंत ठेवत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. या सादरीकरणामुळे महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समृद्ध वारशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. या संशोधनासाठी प्रा. नारायण गवळी, प्रा. नेहा मसालेकर, आय. पी. जंजिरे, सुनील दरेकर, प्रतिभा इंगळे व मच्छिंद्र पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.