Dharmaveer 2 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त

नुकताच 'धर्मवीर २' या चित्रपटाचा मुहूर्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यामध्ये करण्यात आला. या सिनेमाच्या शुटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे.

0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते 'धर्मवीर २' चित्रपटाचा मुहूर्त

नगर : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा दाखवलेला जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर ‘धर्मवीर २'(Dharmaveer 2) चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. नुकताच ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा मुहूर्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ठाण्यामध्ये करण्यात आला. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत या सिनेमाच्या शुटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक ,कलाकार, तंत्रज्ञ तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

नक्की वाचा : ‘कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1’ चा फर्स्ट लूक रिलीज

येत्या ९ डिसेंबरपासून ठाणे येथे ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मंगेश देसाई यांच्या साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे “धर्मवीर २” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आहे. तर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण विट्ठल तरडे निभावणार आहेत. अभिनेता प्रसाद ओक हे दिघे साहेबांची भूमिका साकारणार आहेत. मात्र अन्य कलाकारांची नावे  गुलदस्त्यात  ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा : शुभमन गिल करणार गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व 

“धर्मवीर २” चित्रपटाच्या पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर ‘धर्मवीर २’ आणि “साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट” अशी टॅगलाईन  या मुहूर्ताप्रसंगी नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट रंजक कथानकाद्वारे हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येत आहे. “धर्मवीर २” या चित्रपटातून साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट चित्रपटातून उलगडली जाणार आहे. मात्र या चित्रपटात कोणकोणते कलाकार काम करणार आणि चित्रपटात नेमके काय दाखवले जाणार हे पाहण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी  लागणार असल्याचे निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here