Dharna movement : राहुरी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

Dharna movement : राहुरी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

0
Dharna movement : राहुरी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन
Dharna movement : राहुरी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

Dharna movement : राहुरी : तालुक्यातील काही गावांचे ग्रामसेवक (Gramsevak) बांधकाम कामगारांना ९० दिवसाचे प्रमाणपत्र देत नसल्याचे निषेधार्थ आज पंचायत समिती कार्यालयासमोर बांधकाम कामगार (Construction workers) संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन (Dharna movement) सुरु करण्यात आले.

नक्की वाचा: खासदार लंकेंनी मांडला एलसीबीच्या भ्रष्टाचाराचा अर्थसंकल्प

शासनाच्या सदर योजनांपासून रहावे लागते वंचित

बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी शासनाने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. मंडळामार्फत या बांधकाम कामगारांना विविध प्रकारच्या लाभाच्या योजना राबविण्यात येतात. मात्र, त्यासाठी या बांधकाम कामगारास सदरचे लाभ मिळण्यासाठी ग्रामसेवक यांचे ९० दिवस काम केलेल्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जवळपास सर्वच ग्रामसेवक यांनी यापूर्वी प्रमाणपत्र दिले आहेत. मात्र, आता या सर्व कामगारांना वार्षिक नूतनीकरण करण्यासाठी राहुरी तालुक्यातील शिलेगाव, चिंचविहिरे, राहुरी खुर्द, बारागांव नांदुर, केंदळ, कोळेवाडी, मानोरी व वाबळेवाडी आदी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रमाणपत्र देण्याचे नाकारत आहेत. अहमदनगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २४ एप्रिल रोजी पत्र दिले असताना देखील काही गावातील ग्रामसेवक प्रमाणपत्र देत नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांना शासनाच्या सदर योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.

अवश्य वाचा: पुण्यात मुसळधार पाऊस;अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

प्रमाणपत्र न देणाऱ्यांवर कारवाईची मागणी (Dharna movement)

या घटनेच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने २ जुलै २०२४ रोजी अहमदनगर येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करुन प्रमाणपत्र न देणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करुन त्यांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाकडून पुढे कोणतेही ग्रामसेवक प्रमाणपत्र देण्याचे नाकारणार नाही, असे लेखी पत्र दिले होते. मात्र, सदरचे आदेश देऊनही काही ग्रामसेवक आडमुठेपणाने आजही प्रमाणपत्र देत नाहीत. त्यामुळे बांधकाम कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे.


अहमदनगर बांधकाम विभाग जिल्हा सरचिटणीस नंदु डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने राहुरी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेऊन उद्या आणखी तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा सरचिटणीस नंदु डहाणे यांनी पंचायत समिती प्रशासनाला दिला. यावेळी अंबादास कोळसे, प्रदिप जगधने, दिपक वैरागर, रिजवान शेख, राजू देशमुख, अनिल शिंदे, रेवजी कांबळे, नामदेव आढाव, सोमनाथ कांबळे आदिंसह शेकडो बांधकाम कामगार महिला पुरुष उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी ग्रामसेवकांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here