
Dharne Andolan : नगर : पाथर्डी तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीत दारूबंदी (Liquor Ban) आहे. असे असतानाही ग्रामपंचायतीने बियर बार, दारू विक्री सुरू करण्यासाठी ठराव मंजूर केला आहे. या निषेधार्थ पाडळी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या (ZP) आवारात धरणे आंदोलन (Dharne Andolan) करण्यात आले. संबंधित ठराव तत्काळ रद्द करावा, तसेच जबाबदार सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
पाडळी ग्रामपंचायतीने २५ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेत एका अर्जावर त्यांच्या मालकीच्या परमिट रूम बियर बार सुरू करण्यासाठी ना हरकत दाखला देणारा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, हा ठराव ग्रामपंचायतीच्या कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य दिलीप कचरे, माजी सरपंच बाजीराव गर्जे, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गर्जे, वामन तांदळे, सदस्य उद्धव गर्जे, अंकुश ढाकणे, जिनप्पा फुलमाळी, रमेश कचरे, पांडुरंग काळे, सविता काळे, लताबाई कचरे, रामदास भिसे, प्रवीण गर्जे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल
दारू विक्रीचा ठराव रद्द करण्याची मागणी (Dharne Andolan)
दारू विक्रीसंबंधी कोणताही ठराव मंजूर करण्यापूर्वी महिला ग्रामसभेची संमती घेणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे. मात्र, महिला ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. तसेच ठरावाचा विषय विषयपत्रिकेत स्पष्टपणे नमूद न करता तो ऐनवेळी मांडण्यात आला, ज्यामुळे ग्रामस्थांची दिशाभूल करण्यात आली. ठरावाचा रेकॉर्डिंगदेखील करण्यात आलेले नाही. त्यामुळे दारू विक्रीचा ठराव रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.


