Dheere Dheere Song : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लवकरच ती एका दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘देवरा: पार्ट १’ (Devra Part 1) असं या सिनेमाचं नाव असून यामध्ये ती ज्यु. एनटीआरबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नुकतंच ‘देवरा’ या सिनेमातील जान्हवी आणि ज्यु. एनटीआरचं एक रोमँटिक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘धीरे धीरे’ (Dheere Dheere Song) असं या गाण्याचे बोल असून यामध्ये जान्हवी आणि ज्यु. एनटीआरचा रोमान्स पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा : ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित;’या’ दिवशी येणार चित्रपट
जान्हवी कपूरचे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण (Dheere Dheere Song)
देवरा: पार्ट १’ या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवी कपूर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. याचं चित्रपटातील दुसरं गाणं ‘धीरे-धीरे’ प्रदर्शित झालं आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषेत ‘धीरे-धीरे’ प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात ज्युनियर एनटीआर व जान्हवीची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तसंच दोघांच्या रोमँटिक डान्सनेसगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. धीरे धीरे गाण्यात जान्हवीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
अवश्य वाचा : ‘उदे गं अंबे’…छोट्या पडद्यावर उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा
अनिरुद्ध रविचंदरने संगीतबद्ध केलं ‘धीरे-धीरे’ गाणं (Dheere Dheere Song)
‘धीरे-धीरे’ हे गाणं प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदरने संगीतबद्ध केलं असून शिल्पा रावने गायलं आहे. तसंच कौसर मुनीर या गाण्याचे गीतकार आहेत. ‘बँग बँग’, ‘तौबा तौबा’ सारख्या सुपरहिट गाण्यांचा नृत्यदिग्दर्शक बॉस्को मार्टिसने ‘धीरे-धीरे’ गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूर या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. त्यामुळे दोघांचं ‘धीरे-धीरे’ नवं गाणं सतत पाहिलं आणि ऐकलं जातं आहे. अवघ्या काही तासांतच या गाण्याला युट्यूबर मिलियन मध्ये व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावरही हे गाणं ट्रेंडिंग असल्याचं पाहायला मिळत आहे.
कोराताला शिवा लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूरसह सैफ अली खान, श्रुती मराठे, प्रकाश राज, श्रीकांत, शाइन टॉम चाको आणि नारायण दिसणार आहेत. देवरा: पार्ट १’ हा चित्रपट २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.