Dhurandhar Advance Booking:रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’चा मोठा धमाका; रिलीजपूर्वीच कोट्यवधींची कमाई

0
Dhurandhar Advance Booking:रणवीर सिंहच्या 'धुरंधर'चा मोठा धमाका; रिलीजपूर्वीच कोट्यवधींची कमाई
Dhurandhar Advance Booking:रणवीर सिंहच्या 'धुरंधर'चा मोठा धमाका; रिलीजपूर्वीच कोट्यवधींची कमाई

नगर : मागील अनेक दिवसांपासून चाहते रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) फिल्मची आतुरतेनं वाट पाहत होते. कारण रणवीर त्याच्या उत्तम अभिनयानं सर्वांना प्रभावित करतो. ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ यांसारख्या सिनेमांमधून त्यानं आपल्या अभिनयाची चुणूक सर्वांना दाखवून दिली. आता त्याचा आगामी सिनेमा ‘धुरंधर’कडून (Dhurandhar Movie) लवकरच प्रदर्शित होणार आहे. विशेष बाब म्हणजे रणवीरच्या ‘धुरंधर’ या सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग (Advance Booking) आधीच सुरू झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंग द्वारे या चित्रपटानं आधीच कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

 नक्की वाचा: प्रत्येकाच्या फोनमध्ये संचारसाथी ॲप अनिवार्य, वैशिष्टये काय ?  

अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई (Dhurandhar Advance Booking)

‘धुरंधर’चं  अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. हा चित्रपट आधीच चांगली कमाई करत आहेत. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘धुरंधर’नं ब्लॉक सीट्ससह अॅडव्हान्स बुकिंगमधून आधीच ३.६७ कोटींची कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार ४४,९८७ तिकिटं विकली गेली आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून दोन दिवस बाकी आहेत आणि या दोन दिवसांत, ‘धुरंधर’ला अॅडव्हान्स बुकिंगमधून मोठी कमाई होण्याची अपेक्षा आहे.      

अवश्य वाचा: धनंजय मुंडे यांची हत्या झाली असती पण ते वाचले; रासप आमदाराच्या दाव्याने खळबळ

धुरंधरमध्ये ‘हे’ कलाकार झळकणार  (Dhurandhar Advance Booking)

‘धुरंधर’मध्ये अनेक प्रमुख कलाकार आहेत, ज्यामुळे चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेता अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि आर. माधवन हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे वादही निर्माण झाला आहे.