Dilip Bhalsing | अमित शहा व राधाकृष्ण विखे पाटलांच्या भेटीचे महत्व लंकेंना काय समजणार – दिलीप भालसिंग

0
Dilip Bhalsing
Dilip Bhalsing

Dilip Bhalsing | नगर : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये अमूलचा ब्रॅन्ड निर्माण करून दूध व्यवसायाला प्रोत्साहन दिले. दुधाच्या प्रश्नाबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी त्यांची घेतलेली भेट खासदार निलेश लंकेंना (Nilesh Lanke) समजायला वेळ लागेल, असा टोला भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग (Dilip Bhalsing) यांनी लगावला.

नक्की वाचा : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू

नौटंकीला शेतकरी ओळखून (Dilip Bhalsing)

दूध प्रश्नाच्या संदर्भात दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शहा यांच्या घेतलेल्या भेटीबाबत खासदार निलेश लंके यांनी केलेल्या टीकेचा दिलीप भालसिंग यांनी चांगलाच समाचार घेतला. दुधाच्या प्रश्नाबाबत कोणतीही माहिती नसलेले  स्वयंघोषित नेते दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे भांडवल करून राजकारण करीत आहेत. मात्र, या नौटंकीला शेतकरी ओळखून असल्याने आजच्या आंदोलनचा फज्जा उडाला असल्याची टीका भालसिंग यांनी केली.

अवश्य वाचा : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीतील कीर्तनकाराला जीवे मारण्याची धमकी

महाविकास आघाडीने काय दिले (Dilip Bhalsing)

भालसिंग म्हणाले की, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सहकाराच्या माध्यमातून अमूलचा ब्रॅन्ड निर्माण करून दूध व्यवसायाला पाठबळ त्यामुळेच मंत्री विखे पाटील यांनी शहा यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण असताना या भेटीवर खासदार निलेश लंके यांचे वक्तव्य अतिशय हास्यास्पद आणि किव करणारे आहे. दुधाच्या प्रश्नावरून संसद बंद पाडू म्हणणारे अधिवेशनात एक शब्दही काढू शकले नाहीत. यासाठी प्रश्नाचा अभ्यास असावा लागतो, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील महायुतीचे सरकार दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मंत्री विखे पाटील यांनी त्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे दूध उत्पादकांना ३०रुपये भाव आणि पाच रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी भाजपचे सरकार असताना सुध्दा अनुदान दिले गेले होते. मात्र, आज दूध उत्पादक शेतकऱ्यांबद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवणाऱ्यांनी राज्यात त्यांचे आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांना काय दिले, असा सवाल भालसिंग यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here