Dilip Gundecha : नगर : दहावी पास (10th Pass) झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी (Students) अकरावी आणि बारावी हे वर्ष महत्त्वाचे असते. त्यामुळे जिद्दीने, चिकाटीने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, यशस्वी व्हावे आणि स्वतःचे नाव मोठे करावे, असे प्रतिपादन शिशु संगोपन संस्थाचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा (Dilip Gundecha) यांनी केले. शिशु संगोपन संस्था संचालित महेंंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीतील कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील नवागत विद्यार्थ्यांना विविध वृक्ष देवून स्वागत करण्यात आले.
अवश्य वाचा : विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी – प्रताप सरनाईक
खोसे यांनी मांडला संस्थेचा विकासात्मक आलेख
या स्वागत कार्यक्रमाचे सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव रं. धो. कासवा, खजिनदार अॅड. विजयकुमार मुनोत, संस्थेचे विनोद कटारिया, सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या मुख्याध्यापिका योगिता गांधी, महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय कसबे, पर्यवेक्षक प्रा. संजय शेवाळे, परीक्षा प्रमुख प्रा. गणेश पुंड यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष खोसे यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरचा संस्थेचा विकासात्मक आलेख मांडला.
नक्की वाचा : सुपा येथे विमानतळ उभारा; खासदार नीलेश लंके यांची केंद्र सरकारकडे मागणी
शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील (Dilip Gundecha)
संस्थेने पहिले रोपटे सविता रमेश फिरोदिया या प्रशालेपासून लावले आणि त्यानंतर त्या रोपट्याचे मोठे वृक्ष झाले. प्रशालेनंतर श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल आणि पुढे हायस्कूलच्या मुलांना ११ वी व १२ वीमध्ये चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालय सुरू केले. संस्था गुणवत्तेवर काम करते त्यामुळे सर्व विषयाचे तज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील असतात. टेक्नीकल नॉलेज असेल तरच पुढे जाता येते, त्यामुळे आयटी विषय असल्याने तो निवडा, डोके शांत ठेवा, अभ्यास करा आणि आपले भविष्य उज्ज्वल करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अॅड. मुनोत यांनी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना कुठे कुठे संधी आहे हे सविस्तर सांगितले. आपण किती यशस्वी होतो यावर आपले जीवन असते. ११ वी आणि १२ वी हा विद्यार्थ्यांसाठी टनिर्ंग पाँईट असतो. बारावीची परीक्षा दिल्यानंतर कोणती परीक्षा कठीण जात नाही. पुस्तकावर नजर टाका, अवलोकन करा, परीक्षेसाठी सर्व ताकत लावा आणि आई-वडिलांची अपेक्षा पूर्ण करा.
महाविद्यालयात विविध उपक्रमासह तसेच अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. सध्याचा काळ हा एआयचा असल्याने विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आयटीला प्राधान्य द्यावे,असे सांगितले. यावेळी अकरावीत प्रवेश घेतलेल्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. तसेच एक पेड माँ के नाम या उपक्रमात विद्यार्थ्यांना वृक्षरोपण करण्यासाठी वृक्ष संस्थेच्या पदाधिकार्यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी घरासमोर वृक्ष लावणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उमादेवी राऊत यांनी केले तर प्रा. सुभाष चिंधे यांनी आभार मानले.