नगर : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा अपघात झाला आहे. घरातच पाय घसरुन पडल्यानं त्यांना दुखापत झाली आहे. वळसे पाटलांच्या खुब्याला मार लागला असून हाथ फ्रॅक्चर झाला आहे. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे. याच रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीत वळसे यांची महत्वाची भूमिका आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडवरच त्यांचा अपघात झाला आहे. ट्विट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे.
नक्की वाचा : नवनीत राणांना पाडणार; बच्चू कडूंनी केला निर्धार
ट्विटमध्ये काय म्हणाले वळसे पाटील ? (Dilip Walse Patil)
‘काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल’, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. महायुतीचे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीत. बारामती, मावळ आणि शिरुर या तिन्ही लोकसभा मतदार संघात उमेदवार कोण असणार अशी चर्चा सुरु आहे. अजित पवार गटातून या लोकसभा मतदार संघात उमेदवार देण्यात येणार आहेत. या तिन्ही लोकसभा मतदार संघाची जबाबदारी पक्षाचे तगडे नेते म्हणून वळसे पाटलांवर आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात प्रचार सुरू करायचा असतानाच वळसे पाटलांचा अपघात झाला आहे. त्यामुळे वळसे पाटील यांना आता घरातूनच सुत्र सांभाळावी लागणार आहेत.
अवश्य वाचा : आयपीएलच्या मैदानात हैदराबादची सरशी;मुंबईचा सलग दुसरा पराभव
शिरूर लोकसभा मतदार संघाची वळसे पाटलांवर जबाबदारी (Dilip Walse Patil)
शिरूर लोकसभा मतदार संघातून आढळराव पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदार संघाची वळसे पाटलांवर मोठी जबाबदारी आहे. शिवाय अमोल कोल्हेंना पराभूत करण्यासाठी अजित पवार गटातील प्रत्येक नेत्याने शिरुरकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. मात्र याच काळात आता वळसे पाटलांवर आपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. शस्त्रक्रिया केल्यावर वळसे पाटील मैदानात उतरुन आपल्या उमेदवारासाठी प्रचार करु शकणार की नाही ? हे देखील पाहावं लागणार आहे.