
Dinanath Mangeshkar Hospital : अहिल्यानगर : पैश्यांअभावी रुग्णांची कशी हेळसांड होते हे पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाच्या मुजोरपणामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला (Pregnant Women) प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.
अवश्य वाचा : लोकसभेत मंजूर झालेल्या ‘वक्फ बोर्ड’ विधेयकाला विरोध का ?
पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक
प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या रूग्णालयाच्या समोर आंदोलन केलं जात आहे. पैशांअभावी हॉस्पिटलने गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐन वेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे.
नक्की वाचा : राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मध्यरात्री २.३० वाजता मंजूर
डॉक्टरांनी गर्भवती महिलेसमोरच दिली माहिती (Dinanath Mangeshkar Hospital)
क्रिटिकल सिच्युएशन आहे, ब्लिडिंग होतंय, पोटात दुखतंय, बीपीही हायर साईडला आहे, इमर्जन्सी सिझर करावं लागेल, प्रीमॅच्युअर डिलीव्हरी करायला लागेल, बाळांना सातव्या महिन्यामुळे NICU मध्ये ठेवावं लागेल. NICU चा खर्च प्रत्येक बाळाचा दहा-दहा लाख रुपये आहे. तुम्हाला आता 20 लाख रुपये भरावे लागतील. अशी माहिती डॉक्टरांनी गर्भवती महिलेसमोरच दिली. त्यामुळे इतके पैसे कुठून आणणार या गोष्टीचा गर्भवती महिलेने आणखी मानसिक ताण घेतला. ब्लिडिंग होत असतानाही तुमच्याकडे जी गोळी असेल ती खा असा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिल्याच्या आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. पैशांची व्यवस्था आम्ही करतो, तुम्ही उपचार सुरु करा, आयव्ही लावा, ब्लिडिंग थांबवा, पण त्यांनी उपचार सुरुच केले नाहीत, असे नातेवाईकांनी सांगितले.