Dindi : दिंडी सोहळ्याची सांगता आणि इफ्तार पार्टीचे एकत्र आयोजन

Dindi : दिंडी सोहळ्याची सांगता आणि इफ्तार पार्टीचे एकत्र आयोजन

0
Godad maharaj
Godad maharaj

Dindi : कर्जत : संत सदगुरु गोदड महाराज (Godad maharaj) यांच्या पैठण पायी दिंडीचा (Dindi) सांगता सोहळा आणि रमजानचा (Ramadan) रोजाची इफ्तारी. एकीकडे वदनी कवळ घेताचा जयघोष. तर दुसरीकडे रोजा सोडण्याची निय्यत आणि खजूर असा भक्तीचा मेळावा. माथी काळा बुक्का, वारकरी टोपी, पंचा, डोक्यात नमाजी टोपी असे हिंदू-मुस्लिम सामाजिक ऐक्य कर्जतच्या प्रवीणदादा घुले पाटील मित्रमंडळ आयोजित इफ्तार पार्टीत (Iftar Party) सोमवारी पहावयास मिळाला. याप्रसंगी माजीमंत्री आमदार प्रा. राम शिंदे, प्रवीण घुले यांच्यासह मित्रमंडळाचे अध्यक्ष महेश तनपुरेसह वारकरी आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जन्मस्थळी गोदड महाराजांची आरती पार पडली.

अवश्य वाचा: मांजरीचा जीव वाचवताना विहिरीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू

सामाजिक एकोप्याचे उदाहरण

कर्जतचे ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज यांचे जन्मस्थळ ते पैठण नाथषष्ठी या पायी दिंडी सोहळ्याची सांगता आणि रमजानचे सुरु असणारे रोजे इफ्तारी याचा अनोखा भक्ती मिलाप आणि सामाजिक एकोपा कर्जतमध्ये पहावयास मिळाला. यावेळी बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, संत सदगुरु गोदड महाराजांच्या नगरीत कायम सामाजिक ऐक्य, एकोपा, सर्वधर्म समभाव आणि भाईचारा अबाधित आहे. या पुण्यनगरीत सर्व गुण्यागोविंदाने राहत एकमेकांच्या धर्माचा आदर करतात हे वाखण्याजोगे आहे. संत सदगुरु गोदड महाराजांच्या पैठण पायी दिंडीचा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असल्याचे राम शिंदे म्हणाले. यावेळी बोलताना प्रवीण घुले म्हणाले की, संत सदगुरु गोदड महाराजांच्या पैठण पायी दिंडीत सर्व धर्माच्या लोकांचा सहभाग या पुण्यभूमीची खास वैशिष्ट्ये आहे.

हे देखील वाचा: ‘वाघाची शेळी झाली’; माेदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्याची राज ठाकरेंवर टीका

सामाजिक भाईचारा आजपर्यंत अबाधित (Dindi)

यात सर्व भाविक हरिनामाच्या गजरात आनंदाने मनोभावे तल्लीन होत आपल्या भक्तीचे दर्शन देतात. ते सर्वांसाठी एकतेची शिकवण देणारी ठरते. कर्जत नगरीचा सामाजिक भाईचारा आजपर्यंत अबाधित आहे. हा संत सदगुरु गोदड महाराजांचा आशीर्वाद आहे. तो भविष्यात देखील अशाच अबाधित राहील. याप्रसंगी पैठण पायी दिंडीचे ठिकठिकाणी करण्यात आलेले स्वागत तसेच या काळातील भक्तीचे अनेक अविस्मरणीय क्षणांची माहिती प्रवीण घुले यांनी उपस्थितांना दिली. यावेळी प्रवीण घुले मित्रमंडळाच्यावतीने पायी दिंडीतील सर्व वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मित्रमंडळाच्यावतीने सर्वांना स्नेहभोजन ठेवण्यात आले होते. यावेळी अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, तानाजी पाटील, गोरखे महाराज, मुळे महाराज, सचिन घुले, पिंटूआण्णा पाटील, कासम पठाण, अय्युब काझी, नबीलाल शेख, काका मांडगे, मिरताज बेग, राजू बागवान, माजीद पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here