Dipa Karmakar: दीपा कर्माकरने रचला इतिहास;’जिम्नॅस्टिक’मध्ये जिंकले पहिले सुवर्णपदक

दीपाने उझबेकिस्तान येथील ताश्कंद मध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. ती या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली

0
Dipa Karmarkar
Dipa Karmarkar

नगर : भारताच्या अनेक क्रीडापटूंनी आत्तापर्यंत आपापल्या क्षेत्रात मोठा इतिहास रचला आहे. मात्र ‘जिम्नॅस्टिक'(Gymnastics) या क्रीडा प्रकारात भारताचं नाव गाजवल आहे ते दीपा कर्माकरने. दीपाने उझबेकिस्तान येथील ताश्कंद मध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक (Gold Medal) जिंकून इतिहास रचला आहे. ती या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली.

नक्की वाचा : मिझोराममध्ये खाण कोसळून दहा जणांचा मृत्यू   

दीपाची सुवर्णपदकाला गवसणी (Dipa Karmakar)

यापूर्वी २०१५ मध्ये दीपाला याच स्पर्धेत ब्राँझपदक मिळाले होते. यानंतर आता तिने थेट सुवर्ण कामगिरी नोंदवली आहे. सुवर्णपदक जिंकताना तिने सरासरी १३.५६६ गुण अशी कामगिरी केली. या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या किम सून ह्यंग हिला रौप्य तर ज्यो क्योंग बीयोल हिला ब्राँझ पदक मिळाले आहे. दरम्यान उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे दीपावर २१ महिन्यांची बंदीची कारवाई करण्यात आली होती. पण त्यानंतर तिने आता शानदार पुनरागमन केले आणि ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. तिच्या या कामगिरीसाठी सध्या देशभरातून तिचे कौतुक होत आहे.

अवश्य वाचा : मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; कोकण विभाग सर्वात अव्वल  

दीपाने रचला इतिहास (Dipa Karmakar)

दीपा २०१६ साली ऑलम्पिकमध्ये सामील होणारी भारताची पहिली जिम्नॅस्ट ठरली होती. झालेल्या या ऑलिंपिक स्पर्धेत ती चौथ्या क्रमांकावर राहिली होती. पदक हुकले असले तरी तिच्या या कामगिरीमुळे ती प्रकाशझोतात आली होती. इतकेच नाही, तर तिने २०१४ साली राष्ट्रकुल स्पर्धेतही पदक जिंकले होते. त्यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत जिम्नॅस्टिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला होती. ती एफआयजी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये २०१८ साली सुवर्णपदक जिंकणारी ही पहिली भारतीय होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here