Disabled : नगर : आंध्रप्रदेश सरकारने दिव्यांगांसाठी (Disabled) दरमहा सहा हजार रुपये पेन्शन (Pension) देवून दिव्यांगांचा आर्थिक स्थर उंचावला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य (State of Maharashtra) हे प्रगतशील राज्य आहे. राज्यामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार एकुण दिव्यांगांची संख्या २९ लाख ५६ हजार आहे. पुर्वी दिव्यांगांचे सात प्रकार होते. त्याच्यामध्ये सरकारने दिव्यांमध्ये २१ प्रकार केले असल्यामुळे दिव्यांगांची संख्या जास्त प्रमाणात वाढलेली आहे. दिव्यांगांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने दिव्यांगांना सहा हजार रुपये प्रतिमहा पेन्शन द्यावी, अशी मागणी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अवश्य वाचा : अन्यथा पुढील अंत्यविधी कर्जत तहसील कार्यालयासमोर
राज्यातील दिव्यांगांना न्याय देण्याची मागणी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिशय संवेदनशील असुन त्यांनी चंद्राबाबू नायडू सरकारप्रमाणे दिव्यांगांची पेन्शन वाढवून राज्यातील दिव्यांगांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष ॲड लक्ष्मणराव पोकळे, काकासाहेब दसपुते, संदेश रपारिया, राजेंद्र पोकळे, पोपटराव शेळके, सरला मोहळकर, नंदा शिंदे, कांचन वखारिया यांनी केले आहे.
नक्की वाचा : श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन
दिव्यांगांची हेळसांड थांबलेली नाही (Disabled)
महाराष्ट्र राज्यात प्रथमतः दिव्यांग मंत्रालय मंजूर होवून देखील दिव्यांगांची हेळसांड थांबलेली नाही. शिंदे-फडणवीस-पवार सरकार दिव्यांगांची पेन्शन वाढविण्याची देव सद्बुध्दी देवो, अशी अपेक्षा यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनातर्फे निवेदनातून करण्यात आली आहे.